Ashok Chavan News: अशोक चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंचा फोन; म्हणाले...

याचा विनायक मेटे (Vinayak Mete) करा, अशा प्रकारच्या चर्चाही सुरु असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama

Ashok Chavan News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही खळबळजनक आरोप केले होते. आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत माझ्या मंत्रीपदाच्या काळातील लेटरहेडचा गैरवापर सुरू आहे. सही कायम ठेवून त्यातला मजकूर बदलण्याचे प्रकार सुरू आहेत, असा खळबळजनक आरोप अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला होता. (Conspiracy to assassinate Ashok Chavan; Chief Minister's order to the Director General of Police)

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण यांच्या या आरोपाची दखल घेत पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ''अशोक चव्हाण यांच्याशी मी स्वत: बोललो आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस महासंचालकांशीही माझं बोलणं झालं आहे. अशोक चव्हाणांच्या बाबतीत जी काही घटना घडली आहे याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सुचनाही पोलीस महासंचालकांना दिल्या,'' असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Ashok Chavan News
MPSC Students Protest : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; शेकडो विद्यार्थ्यांनी रात्र रस्त्यावर काढली

अशोक चव्हाण यांनी सोमवारी (20 फेब्रुवारी) नांदेडच्या अतिरक्त पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली. यात त्यांनी आपल्याबाबतीत घातपात होण्याची शक्यता वर्तवली होती. (Nanded) त्यानंतर अर्धापूर येथे बोलतांना त्यांनी पुन्हा कार्यक्रमाला झालेल्या उशीराबद्दल सांगताना या प्रकरणाचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर याचा विनायक मेटे (Vinayak Mete) करा, अशा प्रकारच्या चर्चाही सुरु असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.

चव्हाण म्हणाले, मला आज इथे यायला एक तास उशीर झाला, कारण मी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार द्यायला गेलो होतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहेत. याची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते.

Ashok Chavan News
Ashok Chavan News : माझा मेटे करा, अशा चर्चा सध्या सुरू आहेत, चव्हाणांचा खळबळजनक आरोप..

माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करुन भविष्यात खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितलं होते. राजकीय दृष्ट्या प्रतिमा खराब करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्यासाठी हे बनावट दस्तऐवज तयार केले जात आहेत. माझ्यावर मुंबई आणि नांदेडमध्ये पाळत ठेवली जात आहे. माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता अशोक चव्हाण यांनी वर्तवली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकऱणाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in