काँग्रेसचे दलितांवरील प्रेम हा निव्वळ दिखावा- रामदास आठवले

सचिन पायलट यांच्या वक्तव्यानंतर रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे दलितांवरील प्रेम हा निव्वळ दिखावा- रामदास आठवले
Ramdass Athavle/ ANI Hindi

मुंबई : काँग्रेसचे (Congress) दलितांवरील प्रेम हा निव्वळ देखावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या बदलामुळे काही फरक पडणार नाही, असे म्हणत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार हल्ला चढवला. याचवेळी त्यांनी, राजस्थानमध्ये भाजपचेच सरकार येणार असा विश्वासही व्यक्त केला..

रामदास आठवले यांनी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (sachin pilot) यांच्यावरही निशाणा साधला, नवीन मंत्रिमंडळात चार दलित मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. दलित, उपेक्षित, मागासलेल्यांना सर्वत्र प्रतिनिधित्व मिळावे, अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे. आमच्या सरकारमध्ये दलितांना फार काळ प्रतिनिधित्व मिळाले नाही, आता आम्ही त्याची भरपाई करत आहोत. आदिवासींचे प्रतिनिधित्वही वाढवण्यात आल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले होते.

Ramdass Athavle/ ANI Hindi
कंगनाने पुन्हा डिवचलं, 'इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना चपलेखाली चिरडलं'

सचिन पायलट यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदास आठवले म्हणाले की, काँग्रेसचे दलितांवरील प्रेम हा निव्वळ दिखावा आहे. दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात काँग्रेस नेहमीच अपयशी ठरली. यामुळेच 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. आता राजस्थानातील या फेरबदलाने काहीही फरक पडणार नाही. राजस्थानमध्ये भाजपचेच सरकार स्थापन होणार, असा पुर्नरुच्चार आठवले यांनी केला.

राजस्थानमध्ये आज (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता राजभवनात १५ मंत्र्यांना शपथ दिली जाईल. यामध्ये 11 कॅबिनेट आणि चार राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेमाराम चौधरी, महेंद्रजित मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत हे गेहलोत यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याचवेळी आमदार जाहिदा खान, ब्रिजेंद्र ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीना हे राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

यासोबतच गेहलोत मंत्रिमंडळात या नव्या मंत्र्यांच्या प्रवेशाने जास्तीत जास्त ३० मंत्र्यांचा कोटा पूर्ण होणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ फेरबदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 आमदारांना संसदीय सचिव आणि सात जणांना मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले जाईल. त्याचबरोबर नवीन मंत्रिमंडळात अनुसूचित जाती (एससी) समुदायातील चार सदस्य आणि अनुसूचित जमाती (एसटी) समुदायातील तीन सदस्य असतील. याशिवाय मुस्लिम चेहऱ्यांसह तीन महिलांही यात सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in