‘...तर महाराष्ट्र काँग्रेस शरद पवारांसोबत असेल’

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा : नाना पटोले
Nana Patole-Sharad Pawar
Nana Patole-Sharad Pawar Sarkarnama

मुंबई : ‘संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (यूपीए UPA) राष्ट्रपतीपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित झालं तर आमचं त्यांना समर्थनच राहील. महाराष्ट्रातील व्यक्ती जर देशाचे राष्ट्रपती होत असतील, त्यासाठी त्यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर असेल,’ असे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. (Congress supports Sharad Pawar's candidature in Presidential elections : Nana Patole)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांना ‘राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. सोनिया गांधींनी अनेकांशी चर्चा केली आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी तथा संयुक्त पुरोगामी आघाडीचे प्रमुख उमेदवार असणार आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पटोले यांनी वरील उत्तर दिले.

Nana Patole-Sharad Pawar
मी घोडा नसून आमदार; मला विकत घेणारा पक्ष बघायचाय : हितेंद्र ठाकूर भडकले!

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीला १७२ आमदारांचा पाठिंबा होता. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी १६९ मतांची गरज होती. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार हे अवघ्या दोन मतांनी हरले आहेत. त्यामध्ये कुठे चूक झाली, हे तपासले पाहिजे. या गोष्टी तपासायच्या आहेत. काही दिवसांत या गोष्टी पुढे येतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole-Sharad Pawar
देवेंद्र फडणवीसांची जादू विधान परिषद निवडणुकीतही दिसणार!

देवेंद्र भुयार यांनी ‘माझी बांधिलकी राष्ट्रवादीशी आहे, महाविकास आघाडीशी नाही’ असे वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. त्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही बोलता येणार नाही.

Nana Patole-Sharad Pawar
महाडिकांच्या गुलालाचा खरा धक्का शिवसेनेपेक्षा सतेज पाटलांना बसलाय!

गांधी परिवाराला आलेल्या ईडीच्या नोटिशीबाबत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे केंद्रातील सरकार ज्यापद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग करत आहे. ज्या गांधी परिवाराने देशाच्या स्वातंत्र्यापासून देशाला सर्वस्वी अर्पण करण्याची तयारी ठेवली, त्याच गांधी परिवाराला ईडीची नोटीस पाठवून बदनाम करत आहे. ईडी हे भारतीय जनता पक्षाचे ब्रम्हास्त्र झाले, त्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही उद्या आंदोलन करत आहे. सर्वसामान्य लोकही आता गांधी परिवाराच्या पाठीशी उभे राहणार आहेत, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

संजय राऊतांच्या आरोपामुळे अपक्षांच्या नाराजीचा फटका विधान परिषद निवडणुकीत बसेल का, यावर ‘आमच्याकडे अजून वेळ आहे, त्या काळात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे,’ असे पटोले म्हणाले. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा अपमान होतो आहे. कुठे चुकले हे पाहण्यापेक्षा अशा गोष्टींना पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी नुपूर शर्माला पाठिंबा दिला आहे. भाजपला देशाच्या अपमानाशी काही घेणं देणं नाही, हे यावरून दिसून येत आहे. कोणाच्याही धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही. भाजपकडून धर्मवादाच्या नावावर देशाची बदनामी करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com