Congress Social Media Center : आता काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार

Rahul Gandhi News : 'इंडिया' आघाडीच्या तिसरी बैठक नुकतीच मुंबईत झाली.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama

Mumbai News : इंडिया आघाडीच्या तिसरी बैठक नुकतीच मुंबईत झाली. त्यासाठी आलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी पक्षाच्या प्रदेश मुख्यालयातील भारतरत्न राजीव गांधी सोशल मीडिया सेंटर'चे उद्घाटन केले. तेथून भाजपच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर कॉंग्रेस देणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भाजप (BJP) सातत्याने करीत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसने त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपली ही अत्याधुनिक वॉररुम टिळक भवनमध्ये सुरु केली आहे. भाजप सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूज पसरवत असल्याने त्यांचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व त्यांचा अपप्रचार खोडण्याकरिता ही वॉररुम तयार करण्यात आल्याचे कॉंग्रेसमधून सांगण्यात आले.

Rahul Gandhi News
Jalna Maratha Protest : शरद पवारांचा आंदोलकांना सबुरीचा सल्ला; तर फडणवीसांवर निशाणा; म्हणाले...

काँग्रेस (Congress) सोशल मीडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात ही सोशल मीडिया टीम काम करणार आहे. कॉंग्रेसच्या या सोशल मीडिया केंद्रात स्टुडिओ तसेच अत्याधुनिक सॉफ्टवेरयुक्त उपकरणे आहेत. या सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता अत्यंत कुशल तंत्रज्ञानस्नेही सोशल मीडिया टीम सज्ज आहे.

Rahul Gandhi News
Pune Maratha Protest News : समाजाला उपयोगी नसेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हा ; मराठा मोर्चाची शिंदे-पवारांना हाक

राहुल गांधी (Rahul Gandhi) व खर्गे यांनी या केंद्राची पाहणी करुन सोशल मीडिया यंत्रणेचे कौतुक केले. काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आदी यावेळी उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in