Maharashtra Congress News : सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी काँग्रेसने आखली योजना; उचलणार 'हे' पाऊल

Election News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील वातावरण तापणार
Nana Patole, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nana Patole, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Political News : कर्नाटकात नुकात्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. हे यश देशात काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातन वर्तविली जात आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २३) मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसी बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची योजना आखण्यात आली आहे. (Marathi Latest News)

ही बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसाभेच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना घेण्यासाठी विविध ठराव मंजूर केले आहे. त्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दिल्लीत कुस्तीपट्टूंचे सुरू असलेल्या आंदोलनाचाही समावेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nana Patole, Eknath Shinde, Devendra Fadnavis
UPSC Result : 'युपीएससी'त 'सारथी'चे यश ; 17 उमेदवार प्रशासकीय सेवेसाठी सज्ज !

या बैठकीत, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सरकारच्या (State Government) या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. 'एमपीएसी' उमेदवारांचे भवितव्य अंधारात लोटण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आता टंकलेखन परीक्षेतही आयोगाने गोंधळ घातला. याची चौकशी करण्याचा ठराव केला. राज्यातून महिला व मुली बेपत्ता होत आहेत. प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्य सरकारच्या या उदासीन वृत्तीचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला.

Congress News कोऱ्हाडी उर्जा प्रकल्पाला विरोध होत असून त्याची जनसुनावणी दुपारी साडेबारा वाजता ठेवली आहे. सरकारने दुपारी कार्यक्रम घेऊ नये असा कायदा केला असताना सरकारच कायदा मोडत आहे. ही सुनावणी सायंकाळी घेण्याबाबत ठराव केला.

दिल्लीत महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव केला आहे. दरम्यान, याची भाजप सरकाराने कसलीही दखल घेतली नाही, त्याचा निषेधही केला. दरम्यान, कर्नाटकमधील यशामुळे काँग्रसेच्या पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

Nana Patole, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Rahul Gandhi News : नवा वाद ; काँग्रेसकडून राहुल गांधींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना..? काय आहे प्रकरण?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे. या बैठकीत काँग्रेसने राज्य सरकारसह केंद्र सरकारचा निषेध केला आहे. सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यावरून घेरण्यात येणार आहे. यामुळे आगामी काळात राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वाढली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com