प्रशांत किशोर यांचा काँग्रेसप्रवेश लांबणीवर ; नेत्यांमध्ये मतभिन्नता

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे, याबाबतचा अंतिम निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत.
prashant kishor,Sonia Gandhi
prashant kishor,Sonia Gandhisarkarnama

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकारा प्रशांत किशोर (prashant kishor) यांचा काँग्रेसप्रवेशाबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)घेणार आहेत. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीवर स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सोनिया गांधी यांच्याकडे सोपविला आहे.

समितीचे दोन सदस्य केसी व केसी वेणुगोपाल आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी हा अहवाल सोनिया गांधींनी दिला. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसप्रवेशावर पक्षातील नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

prashant kishor,Sonia Gandhi
मुंबईत राजकारण तापलं ; राणांना रोखण्यासाठी शिवसैनिक सज्ज

या समितीत प्रियंका गांधी वाड्रा, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, पी चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश, मुकुल वासनिक यांचा या समितीत समावेश आहे. त्यांनी सविस्तर अहवाल केला आहे. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचना या व्यावहारीक आणि उपयोगी असल्याचे या अहवालात म्हटलं आहे. पण प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे, याबाबतचा अंतिम निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत.

प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला तर त्यांचा फायदा काँग्रेसला नक्की होणार आहे, अन्य लहान पक्ष आणि संघटना यांच्याशी त्यांचे असलेला संबध यामुळे काँग्रेसला मदत होईल,असे काही नेत्यांचे मत आहे. तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे काही नेत्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची सक्रीय भूमिका आणि क्षमता ही काही नेत्यांना अडचण ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही. सोनिया गांधी या प्रशांत किशोर यांच्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

prashant kishor,Sonia Gandhi
सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला साहित्यिक गपगुमान प्रोत्साहन देतात ; मावजो यांची खंत

काँग्रेसने काय करावे याबाबत मोठ्या प्रमाणात यापूर्वी प्रशांत किशोर यांनी सादरीकरण केले आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या आखलेल्या रणनीतीवर पक्षांतर्गत विचारमंथनही होणार आहे.सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांसमोर पुढील लोकसभा निवडणुकीची ब्लू प्रिंटही पीकेनी गेल्या शनिवारी सादर केली होती.

अनेक वरिष्ठ नेत्यांनी किशोर यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल, प्रियांका गांधी आणि अन्य काही नेते उपस्थित होते.काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीवर सध्या काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे.

काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये युती करून निवडणूक रिंगणात उतरावे असेही पीकेंनी सुचविले आहे. बिहार,उत्तर प्रदेश, आणि ओडिशासारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसने आपल्या रणनीतीवर फेरविचार करावा आणि या राज्यांमध्ये युती टाळावी, असा सल्ला त्यांनी दिल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in