Congress News : तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू : वडेट्टीवार म्हणाले, 'प्रदेश कार्यकारणीने उत्तर द्यावे..'

Vijay Vadettiwar : नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आमने-सामने..
Congress News :
Congress News :Sarkarnama

Congress News : काँग्रेसचे माजी नेते व नाशिक पदवीधर मतदारसंघातले नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला पक्षाकीडून चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले. तसेच आपल्या बदनामीचं षडयंत्र रचले गेले, असे तांबे म्हणाले. तांबेच्या या आरोपावर आता काँग्रेस नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे तांबेच्या मदतीला येत प्रदेश काँग्रेसकडे याचा खुलासा मागितला आहे. यामुळे आता काँग्रेसमध्येच मोठी धुसफूस सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

विजयी वडट्टेवार यांनी याबाबतीत प्रदेश काँग्रेस कार्यकारणीने खुलासा करावा अशी मागणी केली आहे. सत्यजीत तांबेंनी मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. उद्या काँग्रेस नेते सुनील केदार अन् आपली सविस्तर पत्रकार परिषद होईल, असे माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Congress News :
Congress News : सत्यजीत तांबेंना विधानसभा लढवायची होती, एबी फॉर्म योग्यच होता : काँग्रेसचा गौप्यस्फोट

वडेट्टीवार म्हणाले, "सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषेदेत मुद्दे मांडले आहेत. मला वाटतं की ते थोडे गंभीर आहेत. या संदर्भात वरिष्ठाशी चर्चा करून, उद्या आम्ही याविषयी सविस्तर भूमिका पत्रकारांपुढे ठेवू. जे काही घडलं ते गंभीर आहे. पण या गंभीर बाबीचा खुलासा प्रदेश कार्यकारणाने करावा. त्यांचीही भूमिका जाणून घेऊ. "

"काँग्रेस पक्षाच्या हक्काची जागा जर गेली. याबाबती काही चुकीच्या पद्धतीने हाताळणी झाली असेल. नक्कीच त्यासंदर्भात हायकमांड विचारल करेल. म्हणून काही चूक झालीच नाही. एकतर्फी काही बोलणं झालं किंवा एकतर्फी बाजू मांडली गेली तर त्याला खरंही मानता येणार नाही. सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईलच," असे वडेट्टीवार म्हणाले.

Congress News :
Narayan Rane : "भाजपमध्ये माझी अडचण होते" ; नारायण राणे असं का म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com