राजकीय धमाका होणार; आघाडीतील डझनभर नेते 'एनआयए'च्या रडारवर

‘डी-कंपनी’ म्हणजे दाऊद इब्राहीम याच्याशी सलगी करून व्यवहार केलेल्यांच्या यादीत डझनभर राजकीय नेत्यांचे कनेक्शन असल्याचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.
राजकीय धमाका होणार; आघाडीतील डझनभर नेते 'एनआयए'च्या रडारवर
NCP, Shiv Sena, Congress Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : ‘डी-कंपनी’ म्हणजे दाऊद इब्राहीम याच्याशी सलगी करून व्यवहार केलेल्यांच्या यादीत डझनभर राजकीय नेत्यांचे कनेक्शन असल्याचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. भाजपमधून आलेल्या दोघांसह राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसमधील चार आणि शिवसेनेचे दोघेजण या व्यवहारांत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये ठाकरे सरकारमधील काही मंत्री असल्याचे समजते. (Dawood Ibrahim Latest Marathi News)

'एनआयए'ने सोमवारी मुंबई आणि परिसरात 29 ठिकाणी छापेमारी करत अनेकांना ताब्यात घेतलं आहे. या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रे, मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पैसे रियल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे. रियल इस्टेट तसेच अन्य माध्यमातून जमा झालेले पैसे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर ए तयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना पुरवल्या जात असल्याचा मोठा दावा 'एनआयए'ने केला आहे. (Congress, NCP, Shiv Sena Leaders On NIA Radar)

NCP, Shiv Sena, Congress Latest Marathi News
'एनआयए'ची मोठी कारवाई; डी-कंपनीच्या मुसक्या आवळल्या; मुंबईत 24 ठिकाणी छापेमारी

यातूनच डी कंपनीशी संबंधित अनेकांशी काही राजकीय नेत्यांनी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. 'एनआयए'कडून संबंधितांवर कारवाईचा धमाका पुढच्या आठ दिवसात होण्याची शक्यता आहे. डी गॅंग कनेक्शनमध्ये भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एका बड्या नेत्यासह काँग्रेसचा प्रमुख नेता आणि राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना भाजपवर तुटून पडणे भोवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचे अंडलवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांना अटकही झाली. आता त्यांच्याशी संबधित माहिम दर्गा आणि हाजी अली दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सोहेल खंडवानी यांची 'एनआयए'कडून कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपवर सातत्याने तुटून पडणारे राष्ट्रवादीचे चार बडे नेतेही गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत लक्ष्य करणारे काँग्रेसचा एक प्रमुख नेताही रडारवर असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या एका नेत्याचेे व्यवहारही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. 'एनआयए'कडून संबंधितांनी केलेल्या व्यवहारांची लवकरच चौकशी सुरू केली जाऊ शकते, असं सुत्रांकडून समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.