Congress : काँग्रेसचा केंद्राविरोधात हल्लाबोल : नाना पटोलेंसह कार्यकर्ते ताब्यात

"पोलिसी बळाचा वापर करून राजभवनावरील काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा पाठवल्या आहेत.
Congress  : काँग्रेसचा केंद्राविरोधात हल्लाबोल : नाना पटोलेंसह कार्यकर्ते ताब्यात

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी केल्यानंतर काँग्रेस (congress) केंद्र सरकारवर हल्लाबोल करीत आहे. पावसाळी अधिवेशनातही काँग्रेसने सरकारला सातत्याने घेराव घालत आहे. महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

"पोलिसी बळाचा वापर करून राजभवनावरील काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा पाठवल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी काँग्रेस आंदोलन होणार आहे.

Congress  : काँग्रेसचा केंद्राविरोधात हल्लाबोल : नाना पटोलेंसह कार्यकर्ते ताब्यात
Rahul Shewale : शेवाळेंविरोधात तक्रार घेण्यास पोलिसांवर राजकीय दबाव ? ; महिला आयोग आक्रमक

राजधानी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच मोठे नेते रस्त्यावर उतरणार आहेत. यासाठी पक्षाने द्विस्तरीय रणनीती तयार केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. यामुळे मुख्यालयाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच आपल्या मुख्यालयापुढे डेरा टाकला आहे. या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणा सुरू आहे. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा व यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचलेत. वाढती जीएसटी, लष्कराची अग्निपथ योजना, वाढती महागाई, बेरोजगारी, आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेला सत्याग्रह जोपर्यंत सरकार कोणताही दिलासा देत नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस देशभरात आंदोलन करीत आहेत.

दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचाही घेराव काँग्रेस करणार आहे . आदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर वगळता नवी दिल्लीच्या संपूर्ण भागात कलम 144 लागू आहे. निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी लोकांना नवी दिल्लीतील अनेक मार्ग टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in