कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर पटोलेंनी घेतला मोठा निर्णय ; मिर्झां यांना जिल्हाध्यक्षपदावरुन हटवलं

पटोलेंनी मिर्झा यांना जिल्हाध्यक्षपदावरुन मुक्त केले आहे.
Nana Patole
Nana Patolesarkarnama

मुंबई : काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्र अल्पसंख्याक कमिटीच्या अध्यक्षपदी आमदार वजाहत मिर्झा (Wajahat Mirza)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

वजाहत मिर्झा यांच्याकडे सहा पदे होती, यातील एक पद त्यांच्याकडून काढून घेतले असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली. ते म्हणाले, "जिल्हाध्यक्ष पदावरून मिर्झा यांना मुक्त करण्यात आले आहे. "एक व्यक्ती-एक पद"या धोरणानुसार राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
काँग्रेसला 'एक व्यक्ती-एक पद' चा विसर ; संकल्पाला पक्षश्रेष्ठींनी दाखवली केराची टोपली !

वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहेत. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा), अध्यक्ष-अभ्यासगत मंडळ शासकीय वैधकीय महाविद्यालय यवतमाळ, सदस्य- अल्पसंख्यांक हे सर्व पद असतांना आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे 'एक व्यक्ती- एक पद'या धोरणाचा पक्षश्रेष्ठींना विसर पडला का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यानंतर पटोलेंनी मिर्झा यांना जिल्हाध्यक्षपदावरुन मुक्त केले आहे.

उदयपूर येथे काँग्रेसचे नुकतेच संकल्प चिंतन शिबिर झाले. या शिबिरात एकमताने 'एक व्यक्ती, एक पद,' 'एक कुटुंब,एक तिकीट'असा संकल्प करण्यात आला. पण वजाहत मिर्झा यांच्या या नियुक्तीमुळे या संकल्पाला पक्षश्रेष्ठींनी केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in