Nana Patole Criticized Sanjay Raut: जागावाटपावरुन आघाडीत कलगीतुरा; पटोलेंचा राऊतांना सल्ला, 'आम्ही इतक्या जागा..'

Nana Patole Criticize MP Sanjay Raut: नाना पटोलेंनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.
 MP Sanjay Raut, Nana Patole
MP Sanjay Raut, Nana Patole Sarkarnama

MVA News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीस सुरवात केली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने 16-16-16 असा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. पण या चर्चांना आता ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम लावला आहे.

संजय राऊत हे सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. राऊतांच्या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राऊतांना सल्ला दिला आहे. " जागावाटपांबाबत भाष्य करु नये ," असं पटोले म्हणाले.

 MP Sanjay Raut, Nana Patole
Sanjay Raut : कुणाचा पोपट मेलाय..हे कळेल ! ; राऊतांनी फटकारलं.., पवारांच्या पुस्तकात फडणवीसांवर..

ठाकरे गटाचे 19 खासदार लोकसभेत दिसतील, असा राऊतांनी दावा केला. त्यामुळे राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व 18 जागांवर ते लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

"लोकसभेच्या मेरिटच्या आधारावरच जागा वाटप केलं जावं," अशी आमची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत अजूनही काही ठरलेलं नाही. जागा वाटपांबाबत कमिटी बनवून त्यावर निर्णय घेतला जाईल. आम्ही इतक्या जागा लढवणारच आणि जिंकणारच असं वक्तव्य कोणीही करु नये, असं म्हणत नाना पटोलेंनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.

 MP Sanjay Raut, Nana Patole
Nitesh Rane : 'जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते' ; राणेंनी डिवचलं, उद्धव ठाकरेंही पदं विकतात..

काय म्हणाले होते संजय राऊत

आज सकाळी माध्यमांशी बोलताना आज संजय राऊत म्हणाले होते की आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागांविषयी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. 2019 मध्ये लोकसभेच्या ज्या जागा आम्ही जिंकल्या होत्या, त्या आम्ही लढवणारच, असे संजय राऊत म्हणाले, त्यामुळे आता आघाडीतील नेत्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com