
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा कारभार हाती घेताच महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय रद्द केले. तर अनेक कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. त्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभनवात शिंदे व फडणवीसांची भेट घेतली. (Congress Latest Marathi News)
यावेळी माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, अमित देशमुख, सुनील केदार, डॅा. नितीन राऊत आदी उपस्थित होते. या नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काँग्रेस नेत्यांनी मागणी केली की, अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी 50 हजार रु, बागायती शेतकऱ्यांना 1 लाख रु प्राथमिक मदत तत्काळ द्यावी. वाढीव वीजदराला स्थगिती देण्यात यावी, विकास योजना आणि विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ उठवावी, अशा मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. मार्च ते जून 2022 मधील दरम्यान मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यात एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये, अशी मागणी या भेटीत केल्याची माहिती अजित पवारांनी ट्विटरवर दिली.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरले असलेल्या ठिकाणची स्थगिती उठण्याची मागणी केल्याचे समजते. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यानंतर आदल्यादिवशी निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उठवल्यास अनेक संस्थांच्या मार्ग मोकळा होईल. आता याबाबत शिंदे सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.