मध्यप्रदेशात सोमरस अन्‌ महाराष्ट्रात दारू : करसवलतीवरून काँग्रेसने भाजपला सुनावले

प्रदेश काँग्रेस (Congress) सचिव श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे.
Shrirang Barge
Shrirang BargeSarkarnama

मुंबई : मद्यावरील कर कमी केल्यानंतर बेवड्यांचे सरकार (Mahavikas Aghadi Government) अशी टीका करणारे भाजप (BJP) नेते आता, राज्याच्या अर्थसंकल्पातील जनहिताच्या तरतूदींचे स्वागत करीत नाहीत. मध्यप्रदेशातील मद्यावरील करसवलत त्यांना चालते. म्हणजेच भाजपच्या राज्यात 'पवित्र' सोमरस अन महाराष्ट्रात पावशेर असा भाजपचा समज आहे का, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) सचिव श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी लगावला आहे.

Shrirang Barge
फडणवीसांच्या चौकशीवर राऊतांची टीका; म्हणाले, कायद्यापुढे सगळे समान मग हा तमाशा का?

यापूर्वी कोरोनाकाळात राज्य सरकारने मद्यावरील कर कमी केल्यावर, हे तर बेवड्यांचे सरकार आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती. त्यानुसार आता राज्य अर्थसंकल्पातील चांगल्या तरतूदींची प्रशंसा करण्याचा मोठेपणा भाजपने दाखवावा, असेही बरगे यांनी भाजपला सुनावले आहे.

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी अनेक चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शेततळ्यांसाठी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदाने देण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर झाली आहे. तर सीएनजी वरील करात कपात केल्याने गृहिणींसह सर्वसामान्यांनाही मोठाच दिलासा मिळाला आहे. राज्यात व्यापार-उद्योग वाढावेत, स्टार्टअपना प्रोत्साहन मिळावे, आदिवासी विभागातही कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठीही अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. या तरतुदींचेही भाजपने स्वागत करावे, चांगल्याला चांगलेच म्हणावे, असेही बरगे यांनी सुनावले आहे.

Shrirang Barge
फडणवीसांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली...

महाराष्ट्रात मद्यावरील कर कमी झाल्यावर भाजपने टीका केली. मात्र मध्य प्रदेशातही मद्य विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना जाहीर झाल्या होत्या. त्या राज्यातही मद्यावरील कर कमी केले होते. तरीही त्यावर मद्यप्रदेश अशी टीका कोणीही केली नाही. म्हणजेच भाजप राज्यात पवित्र सोमरस आणि काँग्रेस राज्यात पावशेर, असा भाजप नेत्यांच्या दृष्टीने फरक आहे का, अशी खिल्लीही बरगेंनी उडवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com