'कोरोना काळात वाऱ्यावर सोडले; आता उत्तर भारतीयांची आठवण झाली?'

मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांसाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार कार्यालय सुरु करणार
Sachin Sawant, Yogi Adityanath
Sachin Sawant, Yogi Adityanathsarkarnama

मुंबई : मुंबईत राहणा-या उत्तर भारतीय नागरिकांच्या सुविधेसाठी मुंबईमध्ये उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारचे कार्यालय सुरू करणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी जाहीर केला. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्वतुळात उमटण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसचे (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी या निर्णयावर जोरदार टिका केली आहे.

Sachin Sawant, Yogi Adityanath
भाजपने महाराष्ट्रासाठी खोदलेल्या खड्ड्यात संपूर्ण देशातील ओबीसी गेले!

या संदर्भात सावंत यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये सावंत म्हणाले, युपी सरकारने मुंबईत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मुंबई मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आला आहे. युपीचे असंघटित कामगार अनेक राज्यांत आहेत. गुजरात, दिल्ली पंजाबमध्ये का उघडले नाही? दरडोई उत्पन्न देशात कमी असल्याने मजूर स्थलांतरित होतात. कोरोना काळात वाऱ्यावर सोडले. आता आठवण झाली? असा सवाल सावंत यांनी केला आहे.

Sachin Sawant, Yogi Adityanath
आधी माफी मगच अयोध्या; महासभेतच ठराव केल्यानं राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या नागरिकांसाठी कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यालय मुंबईतील असंघटीत उत्तर भारतीय लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल, असे त्यांनी म्हटले आहे. अश्या प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला. दुसऱ्या राज्यात असलेल्या नागरिकांसाठी त्या राज्यात कार्यालय सुरु करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. मुंबईत जवळपास ५० ते ६० लाख उत्तर भारतीय नागरीक राहतात. आगामी मुंबई महानगर पालीकेच्या निवडणुकीमध्ये ही निर्णायक ठरणारी व्होट बॅंक आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com