Andheri by elaction : कुत्र्यांचा व्हिडिओ शेअर करीत सावंतांचा भाजपवर हल्लाबोल...

Mahavikas Aghadi : पराभवाच्या भीतीने उमेदवार मागे घेतला...
 Sachin Sawant Latest News
Sachin Sawant Latest NewsSarkarnama

पुणे : अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारीच मिळू नये यासाठी निर्माण करण्यात आलेले अडथळे, त्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेचे काढलेले वाभाडे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्रानंतर (Bjp) भाजपने घेतलेली माघार यामुळे अंधेरी पुर्वची पोटनिवडणूक चांगलीच गाजली.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावर भाजप आणि शिंदे गटाकडून एखादा नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागेवर निवडणुका न घेता त्यांच्या घरातील सदस्याला बिनविरोध निवडून दिले जाते, अशी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभवाच्या भीतीने आणि उमेदवारी अर्ज भरून मागे घेतल्याची टीका करण्यात येत आहे. कॅाग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपला डिवचलं आहे. (Sachin Sawant Latest News)

 Sachin Sawant Latest News
Karad : उद्धव ठाकरेंनी आमदारांवर गैरविश्वास का दाखवला... शंभूराज देसाईंचा सवाल

सचिन सावंत यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक...पराभवाच्या भीतीने उमेदवार मागे घेतला तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तर कुत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत भाजपने या निवडणुकीतून पळ काढल्याचे त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाल्याने पक्षात पडलेली फूट, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा पहिला विजय म्हणावा लागेल. या विजयाचे पुढे राजकारणात काय पडसाद उमटतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, भाजपच्या माघारीनंतर राज्यात विविध चर्चा सुरू झाल्या असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तर भाजपला पराभव दिसू लागल्यानेच त्यांनी माघार घेतल्याचा दावा केला जात आहे. आता सचिन सावंत यांनी केलेल्या टिकेला भाजप नेते काय प्रतिउत्तर देतात हे बघावं लागणार आहे.

 Sachin Sawant Latest News
Beed : पाहणीची औपचारिकता करणाऱ्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील हाहाकारही पहावा

दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमावर शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही खोचक टीका करणारी पोस्ट व्हायरल केली आहे. दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट करत भाजप आणि शिंदे गटाला डिवचलं आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढायला शिकवलं रडायला नाही. समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असू दे. शेवटी पराभव समोर दिसताच मागार घेतली,असो शेवटी काय धकधकत्या "मशाली" समोर मिंधेगट, महाशक्तीची माघार. ये डर जरूरी है! असा टोला देखील दानवेंनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com