काँग्रेसने 'लाव रे तो व्हिडिओ'च्या अंदाजात केली राज ठाकरेंवर टीका

Sachin Sawant News : काँग्रेस नेते सचिन सांवत यांची व्हिडिओ शेअर करत मनसेवर टीका
 Sachin Sawant News
Sachin Sawant NewsSarkarnama

Sachin Sawant News : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी राहुल गांधींना 'म्हैसूर सॅण्डल सोप' म्हणत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. आता या टिकेला प्रतिउत्तर देत काँग्रेसने राज ठाकरेंना 'ओके साबण' म्हणत डिवचलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मनसेत जुंपण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये रविवारी (दि.२७ नोव्हेंबर) मनसे गटाध्यक्षांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी अनेक मुद्यावर भाष्य केलं. यावेळी सावरकरांवर केलेल्या टिकेबाबत बोलताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राहुल गांधींना म्हैसूर सॅण्डल सोप म्हणत त्यांची नक्कल करत खिल्ली उडवली. तसेच राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सांवत (Sachin Sawant) यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्याला 'मनसे अध्यक्ष म्हणजे 'ओके' साबण'असं कॅप्शन देत ठाकरेंना डिवचलं आहे.

 Sachin Sawant News
ओटीटीवर माझी बदनामी केली, अमेझॉनसह डिस्कवरी प्लसने बिनशर्त माफी मागावी...

ठाकरेंना प्रतिउत्तर देताना सावंत म्हणाले, ''भाजपने (BJP) मनसेचे (MNS) इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे, कारण त्यांच्या भाषणाने यावर शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या १६ वर्षात त्यांनी अनेक भूमिका बदलल्या. त्यामुळे त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत नाही. त्यांनी याबाबत आत्मचिंतन करावं. मात्र ते दुसऱ्यांवर खापर फोडण्याचं काम करत आहेत. जनतेला ब्लू प्रिंट देण्याचं आश्वासन दिल्यानंतर देखील ती अजून देता आली नाही आणि ते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) बुद्धीमत्तेबद्दल बोलताहेत हे हास्यास्पद आहे, असं सावंत म्हणाले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टिकेला प्रतिउत्तर देत काँग्रेसने (Congress) ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि मनसेत जुंपण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com