उद्धल ठाकरे यांच्या हातून मोठी चूक झाली? पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | Prithviraj chavan : उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व आमदारांवर कारवाई करण्याची संधी होती
uddhav thackeray, prithviraj chavan
uddhav thackeray, prithviraj chavansarkarnama

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षांतरबंदी कायद्यानुसार बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांवर कारवाई करण्याची संधी होती, मात्र त्यांनी घाई गडबडीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, ती माझ्या मते फार मोठी चूक झाली आहे. त्यांनी विधिमंडळाला सामोरे जायला पाहिजे होते, असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ABP माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. (Uddhav Thackeray | Prithviraj chavan Latest News)

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) म्हणाले, १९८५ मध्ये राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांनी पक्षांतरबंदी कायदा आणला. मात्र अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) पंतप्रधान असताना त्यांच्या काळात अरुण जेटली (Arun jaitley) यांनी त्याचे संपूर्ण स्वरुपच बदलून टाकले. त्यामुळे कायद्याबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार पाहिले, तर बेकायदेशीर पक्षांतर घडून कायद्याचे उल्लंघन झाले हे स्पष्ट आहे. फुटीर गटाचे कोणत्याही राजकीय पक्षात विलिनीकरण न झाल्यामुळे त्यांना अपात्र करणे अनिवार्य आहे, असेही चव्हाण म्हणाले.

चव्हाण यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या परिस्थितीची अटलबिहारी वाजपेयी यांच्या परिस्थितीशी देखील तुलना केली. तेम्हणाले, उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाला सामोरे जायला हवे होते. विधिमंडळात म्हणणं मांडायला पाहिजे होते, चर्चा झाली असती, महाविकास आघाडीचे सरकार का स्थापन केले, हे महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सांगता आले असते. या सगळ्यावर भाजपची काय भूमिका आहे, हेही स्पष्ट झाले असते.

इतकचं नाही तर वाजपेयींसारखे नुसते भाषण करुन निघून जाण्याचा पर्याय होता, मात्र तेही न करता त्यांनी बहुमत चाचणी होवू द्यायाला पाहिजे होती. त्यात कमी मते पडून त्यांचा पराभव जरी झाला असता, तरी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाले हे जनतेच्या समोर आले असते. त्यानंतर संबंधित आमदारांनाही अपात्र करता येणे सोपे झाले असते, त्यामुळे त्यांनी घाई-गडबडीत एक मोठी संधी गमावली असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in