उमेदवारांची घोषणा होताच काँग्रेसची डोकेदुखी सुरू; माजी मंत्र्यांचा थेट नेत्यांना सवाल

काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी...
उमेदवारांची घोषणा होताच काँग्रेसची डोकेदुखी सुरू; माजी मंत्र्यांचा थेट नेत्यांना सवाल
Congress leader Naseem Khan Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यात राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीही सुरू आहे. काँग्रेसनं माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर पक्षातील नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी हंडोरे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. (Legislative Council Election News)

भाजपने बुधवारी पाच उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर विनायक मेटे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काँग्रेसमधील नाराजीही समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी इम्रान प्रतापगढी यांच्या उमेदवारीवरूनही काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. (Congress Leader Nassem Khan's displeasure over Chandrakant Handore's candidature)

Congress leader Naseem Khan Latest Marathi News
शिवसेनेचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात शेलार गेले अन् केसरकरांशी बोललेही!

काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी हंडोरे यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे. हंडोरे यांनी पक्षासाठी काय केले, असा सवाल त्यांनी एच. के. पाटील यांच्यासमोर उपस्थित केल्याचे समजते. त्यामुळे आता नाराजी दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे. चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे भीमशक्ती संघटनेचे नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. हंडोरे हे मुंबईतील चेंबूर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा इशारा दिला होता.

भाई जगताप (Bhai Jagtap) हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. आगामी महापालिका निवडणुकीआधी भाई जगताप यांना बळ देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसनं त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देऊन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खेळी खेळल्याचं मानलं जात आहे. याचबरोबर काँग्रेसनं उमेदवारांची निवड करताना दोन्ही नेते मुंबईतीलच निवडले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आजच अर्ज भरणार आहेत.

Congress leader Naseem Khan Latest Marathi News
शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांना ४ दिवसात २ वेळा भेटले; अखेर ठाकरेंनी पवारास्त्र वापरले!

विधान परिषदेसाठी 9 जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते (शिवसेना), प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह (सर्व भाजप), संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे.

विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 53, शिवसेना (Shivsena) 56 आणि कॉंग्रेसचे (Congress) 44 आमदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in