मला घाण भाषेत बोललं जातयं, मेसेज येत आहेत; नाना पटोलेंना प्रश्न विचारला ती चूक झाली का?

Nana Patole | Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट करुन नाना पटोले यांना सवाल विचारला होता.
BJP Leader Chitra Wagh Latest Marathi News
BJP Leader Chitra Wagh Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हा व्हिडीओ ट्वीट करुन त्यावर नाना पटोले यांना सवाल विचारला होता. एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती नाना पटोले असल्याचे दावा करत चित्रा वाघ यांनी "काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं असं म्हणतं पटोले यांना डिवचण्याचा प्रयत्न केला".

दरम्यान, या व्हिडीओवरुन आता आपल्याला घाण भाषेत बोललं जातयं, मेसेज येत आहेत, अशी खंत चित्रा वाघ यांनी बोलून दाखविली. चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यभर नानांचा व्हिडीओ व्हायरल होत होता. सर्वजण एकमेकांना ते पाठवत होते, मात्र मी ज्यांचा व्हिडीओ आहे, त्यांना थेट प्रश्न केला. हे काँग्रेसचं कल्चर नाही असं सांगितलं, मात्र त्यावर मलाच घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत. मी प्रश्न विचारला ती माझी चुकी आहे का? असा सवालही वाघ यांनी विचारला.

काल चित्रा वाघ यांनी या व्हिडीओवरुन पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्या म्हणाल्या, माझ्याकडे व्हिडीओ आल्यानंतर मलाही आश्चर्याचा धक्का बसला. तो व्हिडीओ साध्या सुध्या माणसाचा नाही, तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आहे. त्यामुळेच मी थेट ट्विट करुन नानांना प्रश्न विचारला की, नाना हे काय आहे?

मागच्या १० ते १२ दिवसांमध्ये काही ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यात नाना पटोलेंचा व्हिडीओ धक्कादायक आहे. भाजपच्या नेत्याचा अशाप्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्या झाल्या पक्षाने कारवाई केली, मात्र टीकेची धार कमी होताना दिसत नाही. तसेच हा व्हिडीओ जरी खासगी असला तरीही एखादी गोष्ट पब्लिकमध्ये आल्यानंतर ती खासगी राहत नाही, असे म्हणतं व्हिडीओ ट्विट केल्याचे समर्थन केले.

दरम्यान, या व्हिडिओवरून नाना पटोले यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. सर्वत्र त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता त्यांनी हे भाजपचे (BJP) कारस्थान असल्याचा आरोप करत, त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेवून पटोले यांच्या आरोपांना उत्तर दिले.

काय म्हणाले नाना पटोले?

आपल्याला बदनाम करण्याचा हा कट-कारस्थान आहे. याबाबत आमच्या तक्रारी करणे सुरु झाले असून, निश्चित कारवाई होईल. या सगळ्या प्रकरणावर आपली लीगल टीम उत्तर देईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in