
मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकांसाठी निश्चित केलेली प्रभागरचना आणि आरक्षण रद्द करण्याच्या काँग्रेसचे (Congress) नेते, मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या मागणीचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.
फडणवीस यांनी मिलिंद देवरा यांच्या पत्राची तात्काळ दखल घेत सांगितले की, आपले पत्र प्राप्त झाले. त्यातील आपल्या भावनांची योग्य दखल घेतली जाईल. मुंबईकर आणि निष्पक्ष निवडणुकीबाबत जी अपेक्षा मांडली. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
मुंबई महानगर पालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग होता. त्यानंतर राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत बदल करुन मुंबईसाठी एकचा प्रभाग आणि इतर महापालिकांसाठी तीनचा प्रभाग केला आहे. त्यावर भाजप आणि आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसनेही जोरदार आक्षेप घेतला होता. ही प्रभाग रचना शिवसेनेसाठी फायद्याची असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात शिवसेनेचा (Shivsena) फुटीर गट आणि भाजप (Bjp) सत्तेत आल्यानंतर या प्रभाग रचनेत पुन्हा बदल होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
त्यातच मिलिंद देवरा यांनी फडणवीसांना पत्र पाठवून प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण धोरणाला आपण त्वरीत रद्दबातल करावे आणि पारदर्शक पद्धतीने नवीन प्रभाग रचना करण्याकरिता एक स्वतंत्र समितीची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना आणि आरक्षण सोडत लागू करण्यात आली, त्याचा फायदा केवळ एकाच पक्षाला होईल असे लक्षात आले आहे, असा आरोप देवरा यांनी केला.
२०१७ मध्ये काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या महापालिकेच्या ३० जागांपैकी २० जागांची पुनर्रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागणार असल्याचेही देवरांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचे बरेच नगरसेवक या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही देवरा यांनी सांगितले.
प्रभागांची संख्या २२७ वरुन २३६ करण्यापूर्वी नव्याने जनगणना करणे आवश्यक होते. तथापि, महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये २०११ च्या जनगणनेकडेदेखील दुर्लक्ष केले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याचेही देवरा म्हणाले आहे. या पत्रामुळे प्रभाग रचने संदर्भात काय निर्णय होते याकडे लक्ष लागले आहे. मात्र, आता ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांना आधीच उशीर झाला आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत झाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.