राज्यसभेला सहावा उमेदवार शिवसेनेचा निवडून येणार! बाळासाहेब थोरातांनी सांगितलं गणित

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) अखेर होणार असून, या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, भाजपने (BJP) माघार घेण्यास नकार दिल्याने ही निवडणूक होत आहे. यावर काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सहावा उमेदवार शिवसेनेचा निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. (Rajya Sabha Election News Updates)

राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपली. या मुदतीत भाजप तसेच, शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार न घेतल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. सहाव्या जागेवर शिवसेनेकडून (Shivsena) संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक मैदानात उतरले आहेत. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मतांची वर्गवारी केल्यास भाजपला दोन जागा मिळत होत्या. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळत होती. आता एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे. आमचे मित्र पक्ष आणि अपक्ष पाहिल्यास चौथी जागा आमची निवडून येईल.

आमचा मतांचा कोटा पाहाता चौथी जागा महाविकास आघाडीची निवडून येईल, हे स्पष्ट आहे. काही अपक्ष तिकडे असले तरी बहुसंख्य अपक्ष आमच्या बरोबर आहेत. अपक्षांची साथ आम्हाला असली, तरी आम्ही काळजी घेतली आहे. मला खात्री आहे की, आमचा मताचा आकडा चौथा उमेदवार निवडून येईल एवढा आहे. आम्ही पुढाकार घेतला तरी संवाद करण्याची आणि तो टिकवून ठेवण्याची गरज दोन्ही बाजूंची असते, असेही थोरात यांनी स्पष्ट केलं.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. मात्र, भाजपने ही विनंती अमान्य केली असून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीची ऑफर भाजपने स्वीकारली नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केलं.

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत आघाडीकडून भाजपला आणखी एक जागा देण्यात येईल, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांनी भाजपसमोर ठेवला होता. पण त्याला नकार देण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Balasaheb Thorat
आधी हरलेल्या मुख्यमंत्र्यांनी विक्रमी विजय मिळवताच पंतप्रधान मोदी म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल

सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ

राष्ट्रवादी - 53

काँग्रेस - 44

शिवसेना - 55

बहुजन विकास आघाडी - 3

समाजवादी पार्टी - 2

प्रहार जनशक्ती पार्टी - 2

माकप - 1

शेकाप - 1

स्वाभिमानी पक्ष - 1

क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1

अपक्ष - 9

सत्ताधारी आघाडीकडे एकूण संख्याबळ- १७२

Balasaheb Thorat
राज्यसभा निवडणूक होणारच! दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं टाकला पहिला डाव

विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ

भाजप - १०६

जनसुराज्य शक्ती - १

राष्ट्रीय समाज पक्ष - १

अपक्ष - ४

विरोधी पक्षाकडे असलेले एकूण संख्याबळ - ११२

भूमिका उघड न केलेले पक्ष

एमआयएम - २

मनसे - १

एकूण तटस्थ- ३

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in