
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता काही तास उरले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतील पराभवामुळे महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. प्रत्येक मताची जुळवाजुळव आणि नियोजन केले जात आहे. या निवडणुकीत भाजपसाठी विजय सोपा नसला तरी महाविकास आघाडीही ताकही फुंकून पिणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्यासाठी आकड्यांचं हे गणित अवघड नसल्याचं म्हटलं आहे. (MLC Election 2022 Latest Marathi News)
मुंबई माध्यमांशी बोलताना थोरात त्यांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत राहिलेले दोष दुरूस्त झालेले या निवडणुकीत दिसतील. आमचे सर्व उमेदवार विजयी होतील. आम्हाला आठ मतांची गरज आहे, हे खरं असलं तरी भाजपला वीस मतांची गरज आहे.
आमच्यासाठी अवघड नाही. सर्व एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत. आम्ही प्रमुख नेते एकत्र बसून स्टॅटेजी ठरवत आहोत. त्यानंतर त्या-त्या पक्षाने काम करायचे आहे. इतकं साधं सुत्र यामध्ये आहे. एक बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमत्र्यांसोबत होईल. त्यामध्ये आणखी बारकाईने नियोजन करू, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.
अशोक चव्हाण यांनीही विजयात फार अडचण वाटत नाही, असं म्हटलं आहे. भाजपकडे राज्यसभेवेळी अतिरिक्त मतं होती. यावेळी ती नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या तिन्ही पक्षांत चांगला समन्वय आहे. घटकपक्षही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील, यात शंका नाही. अपक्षांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचाही आमच्यावर आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.