फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालतं : थोरातांची खोचक टोला

Balasaheb Thorat : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest News
Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest Newssarkarnama

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla)यांनी काल (17 ऑगस्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'सागर' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे देखील तिथे आले होते, यावरून आता विरोधकांकडून फडणवीसांवर आरोप करण्यात येत आहे.

यावर कॅाग्रेसकडूनही टीका करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेला 'सागर' बंगला हा वॉशिंग मशिनचे काम करत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. (Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest News)

Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest News
शेलारांनी वरळीमधून निवडणूक लढवून दाखवावी; सचिन अहिरांचे खुले आव्हान

महाविकास आघाडीचं (MahaVikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरु होती. शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची याबाबत चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आल्याने शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत. मात्र काल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावरून आता विरोधकांनी फडणवीस आणि भाजपवर टीका केली जात आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज सगळं राजकारण वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या दिशेने जात आहे. जे काय घडतयं त्याकडे महाराष्ट्रातील नाहीतर देशातली जनता जवळून पाहत आहे. की काय घडतंय. जे काय घडतं ते लोकशाहीला हानिकारक आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना या गोष्टीचा एकत्रितपणे विरोध करावा लागेल. सागर बंगला कदाचित वॉशिंग मशीन सारखा काम करत असेल यामुळे रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतली, असा चिमटाही थोरातांनी फडणवीसांना काढला आहे.

Balasaheb Thorat, Devendra Fadnavis Latest News
शिवसेनेतील गळती थांबेना : कोकणातील आणखी एक आमदार पुढील काही तासांत शिंदे गटात!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी माजी मंत्र्याच्या पीएंचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्याचे आदेश दिले आहे. यावर थोरात म्हणाले, त्यांना जे करायचे ते त्यांनी करावं. आमच्याकडे अधिकार असतात ते शासकीय असतात आणि ते सरकारी अधिकारी म्हणून काम करतात ते काय व्यक्तीगत काम करत नसताता ही वस्तुस्थिती आहे. गद्दार आले रे गद्दार आले.. ही घोषणा मुख्यमंत्र्यांना चांगलीच लागली आहे. त्यांनी सांगितलं की याच उत्तर मिळेल. यावर थोरात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्वत:ला प्रश्न विचारावा की आपल वर्तन कसे राहिले आहे. मात्र आम्ही त्यांच्या उत्तरांची वाट बघत आहोत, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in