पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला चोख प्रत्युत्तर दिले!
Minister Ashok ChavanSarkarnama

पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला चोख प्रत्युत्तर दिले!

भाजपने मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे (OBC) आरक्षण रद्द केल्यानंतर रिक्त जागांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल यश मिळाले. आम्ही जरी वेगवेगळे लढलो तरी महाविकास आघाडीला ८५ जागांपैकी ४६ जागांवर वियज मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाला चोख प्रत्युत्तर राज्यातील जनतेने दिले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते व राज्ये बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली आहे. (Congress leader Ashok Chavan criticizes BJP)

Minister Ashok Chavan
हा तर रडीचा डाव; जयंत पाटलांकडून बावनकुळेंना प्रत्युत्तर

अशोक चव्हाण यांनी या संदर्भात एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला, ते म्हणाले ''भाजपने मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली. भाजपची दुटप्पी भूमिका लोकांनी ओळखली. जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या १७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस १७ आणि शिवसेनेचे १२ उमेदवार विजयी झाले आले. भाजपच्या ३१ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र, त्यांचे २३ उमेदवार विजय झाले. भाजपच्या आठ जागा कमी झाल्या. गोळाबेरीज केली तर महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, असे चव्हाण यांनी सांगितले.

Minister Ashok Chavan
मोदींना आव्हान देणारे तेजबहादूर आहेत तरी कोण..?

अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला फटका बसला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन. जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या ८५ जागांमध्ये काँग्रेसच्या १३ जागा होत्या. मात्र, यावेळी १७ उमेदवार विजयी झाले आहेत. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळे असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.