तेव्हा एमआयएमचे आमदार गप्प का होते?

मुस्लीम समाजाला आरक्षण (Muslim Reservation) मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष (Congress) कटिबध्द असल्याचे नसीम खान म्हणाले.
Arif Naseem Khan & Asaduddin Owaisi
Arif Naseem Khan & Asaduddin OwaisiSarkarnama

पुणे : काँग्रेस (Congress) आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण (Muslim Reservation) नंतर सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारमुळे अमलात आले नाही. याबाबत एमआयएमच्या (MIM) दोनही आमदारांनी तेव्हा पाच वर्षे तोंड बंद का ठेवले होते, अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ नसीम खान (Arif Naseem Khan) यांनी एमआयएमवर तोफ डागली आहे.

Arif Naseem Khan & Asaduddin Owaisi
म्हाडाचा पेपर फोडणाऱ्या तिघांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक

एमआयएम व भारतीय जनता पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एमआयएम ने मुस्लिम समाजासाठी काहीही केले नाही. त्यांना फक्त निवडणुका आल्यावरच मुस्लिम आरक्षण आठवते. मात्र, महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सूज्ञ असून तो एमआयएमला थारा देणार नाही, असा टोलाही खान यांनी लगावला आहे. मुस्लिमांना आरक्षण न दिल्यावरून एमआयएमच्या नेत्यांनी मुंबईत महाविकास आघाडी सरकारवर काल (ता.11 डिसेंबर) टीका केली. या टिकेला त्या खान यांनी उत्तर दिले.

Arif Naseem Khan & Asaduddin Owaisi
अजितदादा, भुजबळांनीही गावात जाऊन बसावं! जयंत पाटलांनी सांगितला 'प्लॅन'

नसीम खान म्हणाले, मी अल्पसंख्यांक मंत्री असताना काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात पाच टक्के आरक्षण दिले होते. त्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले? त्यांनी फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही? मुस्लिमांना आरक्षण न देणा-या फडणवीस सरकारची त्यांनी सातत्याने मदतच केली, असा हल्ला खान यांनी असादुद्दीन औवेसींवर चढविला आहे.

मुस्लीम समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'चा नारा देणाऱ्या परंतु सत्तेसाठी समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एमआयएम साथ देत असते. एमआयएमची भूमिका नेहमीच भाजपाला अनुकुल राहिली आहे. महाराष्ट्रात येऊन औवेसींनी मुस्लीम समाजाला भडकावण्याचे प्रयत्न करुन नयेत. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबध्द असल्याचे नसीम खान म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com