Nana Patole, Satyajit Tambe News
Nana Patole, Satyajit Tambe NewsSarkarnama

Nana Patole News : सत्यजीत तांबेंची खेळी फसली? काँग्रेसने नाशिक पदवीधरसाठी जाहीर केला उमेदवार

Nana Patole News : नाना पटोले यांनी काँग्रेसचा नाशिक पदवीधरचा उमेदवार जाहीर केला.

Nana Patole News : नाशिक मतदारसंघात काँग्रेस (Congress) नेते डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमधील परिस्थिती स्पष्ट झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील या आघाडीच्या उमेदवार असल्याचे जाहीर केले.

ते माध्यमांशी बोलत होते. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. आपण काँग्रेसचेच उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, एबी फॉर्म मिळाला नाही, म्हणून आपण अपक्ष अर्ज भरला आहे. तसेच भाजप (BJP) आणि शिंदे गटाला पाठिंबा मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांचे निलंब केले. तसेच त्यांनी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

Nana Patole, Satyajit Tambe News
Satyajit Tambe News : एका विधान परिषदेसाठी भाजपवर नामुष्की; मोदींच्या फोटोला काळे फासलेल्या तांबेंना पाठिंबा?

या मुळे मात्र, सत्यजीत तांबे यांची खेळी फसली आहे. अपक्ष अर्ज भरून आपण आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगायचे आणि भाजपचा पाठिंबा घेऊन निवडणूक बिनविरोध करायची. मात्र, त्यांच्या या खेळीवर पाटील यांनी पाणी फेरले आहे. त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही, निवडणूक लढण्यावर त्या ठाम राहिल्या. त्यांना आता आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, 'जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड घेईल. आमचे जे निर्णय झाले आहे त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे, तर नाशिकमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार असणार आहेत.'

Nana Patole, Satyajit Tambe News
Satyajeet Tambe News : सत्यजित तांबेंनी काँग्रेसशी असलेले नाते तोडले : सोशल मीडियावरील डीपी बदलला, पदांचा उल्लेख हटवला

दरम्यान, नाना पटोले यांनी नागपुरमध्ये बोलताना डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरीच आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले होते. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com