काँग्रेसचा मोर्चा ईडीवर धडकला : पटोले म्हणाले, हुकुमशाहीला लोकशाही मार्गाने उत्तर देणार

मोर्चा ईडीच्या कार्यालयावर जाऊन धडकला त्यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेसचा मोर्चा ईडीवर धडकला : पटोले म्हणाले, हुकुमशाहीला लोकशाही मार्गाने उत्तर देणार
Nana PatoleSarkarnama

मुंबई - सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना ईडीची नोटीस पाठवली. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ), विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. हा मोर्चा ईडीच्या कार्यालयावर जाऊन धडकला त्यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतले. ( Congress front hits ED: Nana Patole says answer to dictatorship in a democratic way )

यावेळी नाना पटोले म्हणाले, केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी व राहुल गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, असा सणसणीत इशारा नाना पटोले यांनी दिला.

Nana Patole
Video: भाजपने नाइलाजाने त्या दोन प्रवक्त्यांना निलंबित केलं !; नाना पटोले

नाना पटोले पुढे म्हणाले की, ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोट्या व बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजप सरकार प्रयत्न करत आहे पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. जनता सरकारनेही इंदिरा गांधी यांच्याविरोधात अशीच कारवाई केली होती, आता भाजप सरकार तेच करत आहे पण अहंकारी, अत्याचारी भाजप सरकारसमोर काँग्रेस कदापि झुकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार कुणाल पाटील, आमदार अमर राजूरकर, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दिकी, आमदार संग्राम थोपटे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, उत्कर्षा रुपवते, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nana Patole
नाना पटोले म्हणाले, हा जागतिक पातळीवर भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न !

नागपूरतही ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आमदार विकास ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, उत्तर भारतीय संघाचे प्रदेशाध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in