शिवसेनेला धक्का; नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन काँग्रेसचा यु-टर्न

Congress | D.B. Patil : काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून घेतला यु-टर्न
D.B. Patil
D.B. PatilSarkarnama

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai international Airport) तयार होण्याआधीच राजकारणाच्या तावडीत सापडले आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोमध्ये मंजूर झाला आहे. राज्य सरकारनेही याबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून हे विमानतळ उभे राहत असल्याने प्रकल्पग्रस्तांचे थोर नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त संघटना, भाजप आणि मनसेपाठोपाठ आता काँग्रेसनेही (Congress) केली आहे. (Navi Mumbai international Airport latest News)

काँग्रेस पक्षाच्या ओबीसी मंथन शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा ठराव ओबीसी मेळाव्यात मांडला असता त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेसची आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला सहमती होती. मात्र आज शिबिरात दि.बा पाटील यांचा ठराव मंजूर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर हा ठराव आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. (Navi Mumbai international Airport latest News)

नवी मुंबईतील जमिनी जेएनपीटी, सिडकोने १९८० च्या दरम्यान ताब्यात घेत शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना एकरी केवळ १० ते २० हजार रुपये मोबदला दिला तेव्हा दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा लढा उभारण्यात आला. १९८४ मध्ये उरण परिसरात झालेल्या आंदोलनात ५ जण शहिद झाले होते. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकारला १९८४ चा ब्रिटिशकालीन अन्यायकारक भूसंपादन कायदा बदलून नवीन कायदा करावा लागला.

तसेच भूमिपुत्रांना १२.५.% जमीन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दि.बा. यांनी आगरी कोळी समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, महाविद्यालये उभ्या केल्या. दि.बांनी केलेला त्याग नवी मुंबई व पनवेल-उरण मधील प्रकल्पग्रस्त विसरला नाही. (Navi Mumbai international Airport latest News)

आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पनवेल व उरणपर्यंत विखुरलेल्या सिडको अधिग्रहीत गावांत होणार असून नवी मुंबईचे वैभव ठरणार आहे. हे विमानतळ भविष्यात शहराची ओळख होणार आहे. त्यामुळे विमानतळाला समाजातील थोर पुरूषाचे नाव देण्याची मागणी सुरुवातीपासून होत आहे. मात्र हे विमानतळ स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांनी त्याग केलेल्या शेतजमिनींवर होणार असल्याने त्यांच्यापैकीच एका नेत्याचे नाव असावे, अशी प्रकल्पग्रस्तांची भावना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com