congress| कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मनाची तयारी आहे का? राहुल गांधींचा बड्या नेत्याला फोन

Rahul Gandhi| काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील तीन कॉग्रेस नेत्यांच्या नावांबद्दल चर्चा केली होती.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

मुंबई : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election)येत्या 17 ऑक्टोबरला होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून अनेक नावं चर्चेत आहेत. असे असताना आता मोठी बातमी समोर आली आहे.

कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वत: फोन करुन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन करुन याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी तुमच्या मनाची तयारी आहेत का? अशी विचारणा राहुल गांधींनी नाना पटोले यांना केलाची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आपली तयारी आहे का? अशी विचारणा केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील तीन कॉग्रेस नेत्यांच्या नावांबद्दल चर्चा केली होती. यात ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, मुकूल वासनिक आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नावं होती. मात्र, राहुल गांधीच कॉंग्रेसचे अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा नाना पटोले यांनी म्हटले होते.

राहुल गांधी यांचा नाना पटोले यांनाच फोन का?

नाना पटोले हे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक म्हणूनही नाना पटोले यांची काँग्रेसमध्ये ओळख आहे. तसेच, ते ओबीसी नेतेही आहेत. पावणे दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक राहिला असताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कॉंग्रेसनध्ये आले.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी फक्त माझ्या नावाची चर्चा ह्या फक्त अफवा आहेत. राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं अशी आमची इच्छा आहे. तसेच राहुल गांधी यांनींच काँग्रेसचे अध्यक्षपदी रहावं, अशी 99 टक्के कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in