सुधीर मुनगंटीवारांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप ; व्हिडिओ रेकॉर्डींग बघा..

आव्हाड, ठाकूर यांच्या मतपत्रिकेवर फेर सुनावणी सुरु आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप ; व्हिडिओ रेकॉर्डींग बघा..
Sudhir Mungantiwar sarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या तीन आमदारांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर आता भाजपच्या एका आमदाराच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे.

महाविकास आघाडीतील जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे, तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, तर अशाच प्रकारे यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली, सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींना दिसेल अशी मतपत्रिका दाखवल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Sudhir Mungantiwar
Rajya Sabha Election : कोणता संजय ठरणार अश्वत्थामा ? ; बोंडेंच्या विधानानं खळबळ

भाजपचे आमदार आशिष शेलार आणि पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे. मतपत्रिका दाखवायची असते, ती हाताळायला द्यायची नसते, असा निवडणुकीचा नियम आहे. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. आव्हाड, ठाकूर यांच्या मतपत्रिकेवर फेर सुनावणी सुरु आहे.

भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी मतपत्रिका हातात दिली, असा आक्षेप काँग्रेसचे अमर राजुरकरांनी यांनी घेतला आहे. त्यांनी लेखी आक्षेप नोंदवला आहे. "मी कोणत्याही मतदान पत्रिकेला हात लावलेला नाही. व्हिडिओ रेकॉर्डींग बघावं. उलट आघाडीतील काहींनी मतपत्रिका हातात घेतल्या आहेत, त्यावर आम्ही आक्षेप घेतला आहे," असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी माध्यमांशी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in