बदली प्रक्रियेत घोळ : डीसीपींना बदलीनंतर 19 दिवसांनी नियुक्ती!

Officers Transfer News : पोलिस अधिकाऱ्यांना मागील १८ दिवस नियुक्तीच देण्यात आली नव्हती.
Officers Transfer News
Officers Transfer News Sarkarnama

पिंपरी : राज्यातील ११० डीसीपी तथा एसपींच्या काल (ता.७) राज्य सरकारने बदल्या केल्या. त्यात पिंपरी-चिंचवडमधील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात (ता.२०) बदल्या केलेल्या ४३ पैकी १९ डीसीपी स्तरावरच्या ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मागील १८ दिवस नियुक्तीच देण्यात आली नव्हती. ती आता देण्यात आली. दरम्यान, आज बदली केलेल्यांपैकीही दहाजणांना पोस्टिंग देण्यात न आल्याने बदलीचा घोळात घोळ सुरुच राहिला आहे.

Officers Transfer News
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; सुहेल शर्मा,अमोल तांबे, स्मार्तना पाटील पुण्यात...

पिंपरी-चिंचवडमधील पोलिस उपायुक्त तथा डीसीपी (परिमंडळ एक) मंचक इप्पर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) नाशिक येथे एसपी (पोलिस अधिक्षक), तर आनंद भोईटे (परिमंडळ दोन) यांची अतिरिक्त अधिक्षक, बारामती, पुणे ग्रामीण येथे आज बदली करण्यात आली. तर पोलिस प्रशिक्षण संस्था, सोलापूरच्या प्राचार्या स्वप्ना गोरे आणि डीसीपी, पुणे विवेक पाटील हे पिंपरी-चिंचवडमध्ये बदलून आले आहेत.

बदली झालेले काही अधिकारी पुढीलप्रमाणे : समोर बदलीचे ठिकाण

डीसीपी झोन ३,पुणे पोर्णिमा गायकवाड - राज्य राखीव दल( एसआरपी) , गट क्रमांक १२, हिंगोली

डीसीपी वाहतूक,पुणे राहूल श्रीरामे - एसपी, राज्य सुरक्षा महामंडळ

प्राचार्य.,पीटीएस (पोलिस प्रशिक्षण संस्था), खंडाळा शशिकांत बोराटे - डीसीपी, पुणे

डीसीपी,झोन २,पुणे सागर पाटील - डीसीपी अमरावती शहर

अप्पर पोलिस अधिक्षक,जालना विक्रांत देशमुख - डीसीपी, पुणे

डीसीपी पुणे,प्रियंका नारनवरे - समादेशक (कमांडट) एसआरपी ग्रुप चार, नागपूर

डीसीपी,ईओयू (आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखा) पुणे भाग्यश्री नवटके - एसआरपी,गट क्र.१७, चंद्रपूर

कमांडट,एसआरपी,हिंगोली संदीपसिंह गिल - डीसीपी, पुणे

एसपी,एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)पुणे विभाग राजेश बनसोडे - एसपी, पोलिस बिनतारी, पुणे

एसपी,पोलिस बिनतारी,पुणे स्मार्तना पाटील - डीसीपी, पुणे

डीसीपी,झोन वन,नाशिक अमोल तांबे - एसपी, एसीबी, पुणे विभाग

सुहेल शर्मा - डीसीपी, पुणे

एसपी, नागरी हक्क संरक्षण (पीसीआर) अमोल झेंडे - डीसीपी, पुणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com