लॉकडाऊनबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्री निर्णय घेणार

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक होत आहे.
Kishori Pednekar

Kishori Pednekar

sarkarnama

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मुंबईकर चिंतेत आहेत. मुंबईतील नव्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवारी मुंबईत रुग्णांची संख्या 20 हजाराहुन जास्त वाढल्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन होणार का याबाबत मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांना माहिती दिली.

''सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं,'' असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ''कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या बैठकीनंतर मुंबईत लॉकडाऊन करावचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल,'' सध्या डॉक्टर, बेस्ट कर्मचारी बाधित होत आहेत. सध्या बेड्स रिकामे आहेत, त्यामुळे काही निर्णय घेत नाही आहोत असे त्या म्हणाल्या.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 20 हजार 181 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्यानं नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आढळल्यास मुंबईत निर्बंध कठोर करण्यात येतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मुंबईत 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने आता लॉकडाऊन लावलं जाईलं का? असा प्रश्न समोर येत आहे.

''गंभीर रुग्णांसाठी 22 हजारांचे बेड्स राखीव ठेवले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी देखील काही बेड्स राखीव ठेवले आहेत. मात्र, सध्या बाधित असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत. सध्या रुग्णालयात 1 हजार 170 रुग्ण आहेत. रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध वाढवावे लागतील. घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी,'' असे आवाहन पेडणेकरांनी मुंबईकरांना केले आहे.

<div class="paragraphs"><p>Kishori Pednekar</p><p></p></div>
पुरंदर विमानतळ खेडला जाणार का?

पेडणेकर म्हणाल्या, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या संकटापासून जनतेला कसे वाचवता येईल याचाच विचार करत आहेत. यासाठी ते तज्ज्ञांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे पेडणेकर यांनी केले. संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही, मात्र काही नागरिक बेफिकीरीनं वागत राहिले तर संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी निर्बंधात वाढ करावी लागले,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in