पटोलेंविरोधात काँग्रेस नेत्यांच्या पक्षश्रेष्ठींकडी तक्रारी

काँग्रेसच्या (Congress) काही ज्येष्ठ नेत्यांनी हायकमांडकडे नाना पटोले (Nana Patole) यांच्या तक्रारी केल्या असल्याचे बोलले जात आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपच्या (BJP) निशाण्यावर आलेले काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर स्वपक्षातूनही नाराजी ओढविल्याचे सांगण्यात येत आहे. पटोले यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवत काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी हायकमांडकडे पटोले यांची तक्रार केल्याचेही समजते.

Nana Patole
अखेर पर्रीकरांचे भाजपविरोधात बंड : पणजीतून निवडणूक लढवण्याची घोषणा

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) असतानाही वेगवेगळ्या भूमिका मांडण्यापासून संघटनेत आणि निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठांना डावलले जात असल्याचा सूरही काही नेत्यांनी आपल्या तक्रारींत ठेवला असल्याचे बोलले जात आहे. संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी स्वबळाचे नारा दिलेल्या पटोलेंनी स्वपक्षातच विरोधाला समोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान मोदी यांना शिव्या देऊ शकतो आणि मारूही शकतो, या विधानवरून पटोले चर्चेत आले असून, त्यांच्याविरोधात रस्त्यांवर उतरण्यापासून गुन्हे दाखल करण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. पटोले यांची ही भाषा स्वपक्षीयांनाही रुचलेली नसून, त्यावरून खासगी नाराजी व्यक्त केली जात आहे.

Nana Patole
दहा तास वाट पाहिली... पण अमित शहा भेटलेच नाहीत!

देशाच्या प्रमुखांबद्दल हे बोलणे योग्य नसल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत. हीच संधी साधून राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पटोले यांच्या पवित्र्यामुळे पक्ष वाढण्याऐवजी अडचणीत येत असल्याकडे लक्ष वेधले आहे. अशा कारणांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून, त्याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही हे नेते वर्तवित आहेत.

भाजपला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही महाविकास आघाडीची शक्यता व्यक्त होऊनही पटोले यांनी ‘एकला चला रे’ची भूमिका मांडली आणि त्यावर ठाम असल्याचे सांगून मित्र पक्षांना दुखावले. त्यावरून शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीनेही (NCP) नाराजी व्यक्त केल्यानंतर पटोले यांना दिल्लीत बोलावून समज दिल्याचे तेव्हा सांगण्यात आले. त्याचवेळी लोणावळ्यातील एका कार्यक्रमात पटोले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच हल्ला केला. तेव्हाही काँग्रेसच्या काही मंत्र्यांनीच पटोले यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याचे बोलले गेले. तसेच, पक्ष संघटनेतील नेमणुकांवरूनही पटोले आपल्याच पक्षातील नेत्यांच्या डोळयांवर आले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडल्यानेही पटोले यांच्याबाबत हायकमांड नाखूष असल्याची चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com