अंधेरीचे राजकारण पुन्हा तापले; गोप्यस्फोट करत ठाकरे गटाची आयोगात धाव

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने (BJP) माघार घेतल्यानंतरही ऋतुजा लटकेंसाठी मार्ग सोपा नसल्याचे बोलले जात आहे.
Rituja Latke
Rituja LatkeSarkarnama

Andheri East By-election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने (BJP) माघार घेतल्यानंतरही ऋतुजा लटकेंसाठी मार्ग सोपा नसल्याचे बोलले जात आहे. याला कारण दिले जाते ते अंधेरी विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या नोटाच्या प्रचाराचे. या संदर्भातील काही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. मात्र, आता ठाकरे गटाने थेट निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अंधेरीत पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नोटाचा प्रचार करणाऱ्यांया क्लिप निवडणूक आयोग आणि पोलिसांना दिल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत दिली. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ऋतुजा लटके (Rituja Latke) आणि अनिल परब यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी परब यांनी नोटाच्या प्रचाराबद्दल माहिती दिली.

परब म्हणाले, 'आमच्याकडे जी माहिती आली आहे. त्यात असे कळते की काही लोकांना पैसे देऊन 'नोटा'ची बटण दाबण्यासाठी लोकांना नोटा दिल्या जात आहे. नोटांचा वापर 'नोटा'साठी केला जात असल्याची माहिती आम्हाला दररोज मिळत असल्याचेही परब यांनी सांगितले. यासंदर्भात मी निवडणूक आयोगात पोलिसांकडे तक्रारी केल्या आहे. ज्या भागातून ही माहिती मिळते, त्या भागांची नावे आम्ही पोलिसांना व निवडणूक आयोगाला दिली आहे, असेही परब यांनी सांगितले.

आयोगाला आवाहन केले की, नोटा हा त्या माणसाचा अधिकार असतो. हा प्रचाराचा भाग नसतो. एखाद्या व्यक्तीला कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही, तर त्याने नोटाचे बटण दाबयचे असते. हा त्या व्यक्तीचा मूलभुत अधिकार आहे. त्याचा प्रचार करता येत नाही, असेही परब यांनी सांगितले.

अशा प्रकारे प्रचार करणाऱ्या क्लिप आमच्या हाती लागल्या आहे. त्या क्लिप आम्ही निवडणूक आयोगाला दिल्या. मला खात्री आहे की, निवडणूक आयोग यावर तातडीने कारवाई करेल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. अनिल परब म्हणाले, मी जे व्हिडीओ बघितले, त्यात आरपीआयचे पदाधिकारी उघडपणे हा प्रचार करत आहेत.

आरपीआय भाजपच्या सोबत असलेला पक्ष आहे. त्या पक्षाचे समर्थन भाजपला असल्याचेही परब यांनी सांगितले. त्यामुळे मला असे वाटते की एका बाजूने सहानुभूती, सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास या गोष्टींचा आदर राखून त्यांनी उमेदवार मागे घेतला. मात्र, दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने नोटाचे बटण दाबून निषेध व्यक्त करा, असे सुरु असा आरोप परब यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in