दिपाली सय्यद यांच्या हत्येचा कट; भाजपच्या ११ महिलांविरोधात तक्रार दाखल

Deepali Sayed| Shivsena vs BJP| पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप दिपाली सय्यद यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे.
दिपाली सय्यद यांच्या हत्येचा कट; भाजपच्या ११ महिलांविरोधात तक्रार दाखल
Deepali Sayed

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेत्या दिपाली सय्यद आणि भाजप (BJP) महिला मोर्चातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. दिपाली सय्यद यांनी भाजपा महिला मोर्चातील अकरा महिलांविरूद्ध ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी यात, दिव्या ढोले, मनिषा जैन वर्षा डहाळे, रीदा रशिद, कविता देशमुख, प्रिया के. शर्मा, रिटा मखवाना, मंजु वैष्णव, दिपाली मोकाशी , प्रणीता देवरे आणि नयना वसानी यांचा समावेश आहे. भाजपच्या या सर्व महिलांंवर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (Shivsena-BJP womens War)

गेल्या आठवड्यात दिपाली सय्यद आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप दिपाली सय्यद यांच्याविरोधात आक्रमक झाली असून त्यांना घरात घुसून बदडून काढण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर आता दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्या उमा खापरे आणि त्यांच्या महिला साथीदारांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Deepali Sayed
Rajyasabha Election : मनसेचे मत कुणाला ? ; राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

- असा आहे या प्रकरणाचा घटनाक्रम?

हे प्रकरण सुरु झालं ते भाजप नेते किरीट सोमय्यांपासून....

मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख लुच्चा असा केला होता. “उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्याचं नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. तर खासदार नवनीत राणा यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, हे संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमान चरणी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं होतं.

- सोमय्यांच्या टीकेला दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया...

या टिकांना उत्तर देताना दिपाली सय्यद यांनी भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री भाजपमध्ये जातात आणि पवित्र होतात. मग पंतप्रधानही त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर काहीच बोलले जात नाही. असा.*** (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल”, असं त्यांनी म्हटलं होतं.

- भाजप नेत्या उमा खापरेंचा दिपाली सय्यद यांना बदडून काढण्याचा इशारा

दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भाजपा नेत्या उमा खापरे यांनी त्यांना थेट घरात घुसून बदडून काढण्याचाच इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोललो तर लगेच प्रसिद्धी मिळते हे त्यांना माहित आहे. पण यापुढे जर त्या बाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्ये केलं तर तिला घरात घुसून बदडून काढू. आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा भाजपा नेत्या उमा खापरे यांनी दिला.

- उमा खापरेंच्या इशाऱ्याला दिपाली सय्यद यांचे उत्तर

या इशाऱ्यावर बोलताना दिपाली सय्यद यांनीही उमा खापरेंच्या सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुम्ही काय माझ्या घरात घुसणार? तुमच्यात तेवढी ताकद आहे का बघा,” असा खोचक टोला सय्यद यांनी भाजपाला लगावला. “कोणाबद्दल असं बोललं नाही पाहिजे. पंतप्रधान जसे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत तसे मुख्यमंत्री नाही का, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला तुमच्याकडे काही किंमत नाही का?असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला आहे. तुम्ही काहीही बोललं तर चालतं, उचलली जीभ लावली टाळ्याला हे बरोबर आहे का? असही त्यांनी विचारलं आहे. काय करायचं ते करा…येताय ना माझ्या घरी, पाहतेच मी,” असं प्रती आव्हानच दिपाली सय्यद यांनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in