सत्तारांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे भाष्य : ‘सत्तारांचं बोलणं चुकीचंच; पण....’

दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे.
Abdul Sattar-Devendra Fadnavis
Abdul Sattar-Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) जे बोलले आहेत, त्याचं कुठलंही समर्थन मी करणार नाही. ते चुकीचंच आहे. पण, त्याचवेळी त्यांना खोके आणि उलटसुलट बोलणे हेदेखील चुकीचे आहे. हेही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तार यांच्या वाद्‌ग्रस्त वक्त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Commentary of Devendra Fadnavis on Abdul Sattar's statement)

उपमुख्यमंत्री फडणवीस हे गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये अभिवादन करून आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्तार यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, महिलांबद्दल कोणीही अपशब्द वापरू नयेत, ते अतिशय चुकीचे आहे. आम्ही तर त्याचा विरोधच करू. पण, हे आमच्या नेत्यांना जसं लागू आहे, तसं ते विरोधी पक्षातील लोकांनाही लागू आहे. आज मला त्यामध्ये जायचे नाही. मात्र, राजकारणाात कुठेतरी आचारसंहिता पाळली गेली पाहिजे.

Abdul Sattar-Devendra Fadnavis
अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा; अन्यथा.... : राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी आक्रमक

राजकारणाची पातळी खाली चालली आहे. महाराष्ट्रात राजकारणाची अशी पातळी असू नये असं मला वाटतं. जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना सांगत नाहीत, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. अन्यथा नेत्यांनी वेगळं बोलायचं आणि त्यांच्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्याचं समर्थन करायचं, असं करणं योग्य होणार नाही, त्यामुळे सगळीकडील नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

Abdul Sattar-Devendra Fadnavis
हर हर महादेव चित्रपटावर न बोलण्याचा राज ठाकरेंचा मनसे प्रवक्त्यांना आदेश

हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधाबाबतही फडणवीस यांनी आपले मत नोंदविले. ते म्हणाले की लोकशाही मार्गाने प्रत्येकाने विरोध करायला हवा. पण, असंविधानिक मार्गाने जाऊन लोकांना मारहाण करणे, हे सहन केले जाणार नाही. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मी हर हर महादेव सिनेमा पाहिलेला नाही, त्यामुळे तो काय वाद आहे, हे मला माहिती नाही. पण कोणाला जर त्याबाबत आक्षेप असतील तर त्यांंनी सनदशीर मार्गाने मांडावेत. मात्र, मल्टिफ्लेक्समध्ये शिरून तेथील लोकांना मारहाण करणे, त्यांच्याशी दादागिरी करणे, हे सहन केले जाणार नाही, असे इशाराही फडणवीस यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in