
दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे आज (बुधवारी ) निधन झाले. ते गेल्या ४२ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. (Comedian Raju Srivastava passes away)
४२ दिवसांपासून राजू हे व्हेंटिलेटरवरच (Ventilator) होते . मध्यंतरी राजू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत होती, 10 आॅगस्ट रोजी राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेव्हापासून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा, असे आवाहन राजू यांची मुलगी अंतरा हीने चाहत्यांना केले होते. राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबीय पूजा-पाठदेखील करत होते.
राजू यांना गेल्या चार दिवसांपासून ताप होता. राजू यांच्या डोळ्यात आणि घशात थोडी हालचाल झाली. डोळ्याच्या रेटिनाची हालचाल हे सकारात्मक लक्षण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु नंतर रात्रीपासून तब्येत खालावत गेली.
58 वर्षीय राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट 2022 रोजी व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. सातत्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार होत होते. राजू यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा तर करत होते.
डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूचे सीटी स्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली. न्यूरोलॉजी विभागातील विशेष डॉक्टरांचे पथक 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.
रविवारपर्यंत त्यांना 20 टक्के ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यात आणखी 10% घट झाली. म्हणजेच, त्यांच्या शरीराला फक्त 10% ऑक्सिजन सपोर्टची गरज होती. एक-दोन दिवसांत व्हेंटिलेटर काढले जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.