२४ तासांत मुख्यमंत्र्यांचा 'यू टर्न'; पृथ्वीराज चव्हाणांना वाटले आश्चर्य!

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Govt) अस्तित्वावर प्रश्न
Udhav Thackeray News, Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra
Udhav Thackeray News, Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra sarkarnama

मुंबई : गुवाहटी येथे शिवसेनेचे ४८ आमदार जमलेले पाहून दबावाखाली येऊन मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे का, असा प्रश्न करून हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून अधिकृत भूमिका घ्यायला आमच्या हातात काहीही नाही. पण, २४ तासाच्या आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अशी भूमिका घेतील याचे आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केली आहे.(Udhav Thackeray News in Marathi)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदारांची इच्छा असेल तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहोत. आधी तुम्ही २४ तासांच्या आत मुंबईत या, असे आवाहन केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीतून ते बाहेर पडणार असतील तर ते भाजपसोबत जाणार आहेत का, अधिकृतपणे उद्धवजी आपल्या वक्तव्यात असे काहीही बोलले नाहीत.(Prithviraj Chavan News)

Udhav Thackeray News, Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra
एकनाथ शिंदे नारायण राणे होतील : शिवसेना नेत्याने आधीच सांगितले होते...

गुहाटीला ४८ आमदार जमलेले पाहून त्यांच्या दबावाखाली येऊन शिवसेनेच्या प्रमुखांनी ही भूमिका घेतली आहे का. हे अजून स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडून शिवसेना व मुख्यमंत्री भाजपसोबत जाणार का, दुय्यम भुमिका घ्यायला तयार आहेत का. त्यांचा अधिकृत प्रवक्ता कोण आहे, हेच समजायला तयार नाही. काल उद्धवजी आपल्या वक्तव्यात असे काहीही बोलले नव्हते.

Udhav Thackeray News, Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra
Narayan Rane : 'संजय राऊत खूश! कारण सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल'

काही आमदार सत्ता टिकविण्याकरीता किंवा सत्तेत राहण्याकरिता दबावाखाली 'यु टर्न' घेतील असे वाटत नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका घ्यायला आमच्या हातात काहीही नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने काय भूमिका घ्यायची हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २४ तासांच्या आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी भूमिका घेतील याचे आश्चर्य वाटते.

Udhav Thackeray News, Prithviraj Chavan News, Political Crisis in Maharashtra
त्या आमदारांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी... निलम गोऱ्हे

उद्धवजींना काही मंडळी भेटायला गेली होती. त्यावेळी काहीही चर्चा झाली नाही. त्यांची स्वतःची भूमिका काय आहे हे त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले पाहिजे. शिवसेना कोणासोबत आहे, हे त्यांनी सांगणे गरजेचे आहे. आता एकनाथ शिंदे गटाने आपला गटनेता नेमलेला आहे. व्यक्तीगत स्वरूपाची बातचित असेल शिवसेनेच्या काही मंडळींनी गुहाटीतील बंडखोर आमदारांपर्यंत त्यांच्या भावना पोहोचवली आहे. आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com