रामदास आठवलेंना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन - CM yogi adityanath dials phone ramdas athavale | Politics Marathi News - Sarkarnama

रामदास आठवलेंना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

आठवले देखील हाथरसला जाणार 

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. आठवले हे सहा आॅक्टोबर रोजी दलित युवतीच्या कुटुंबियांची हाथरस येथे जाऊन भेट घेणार आहेत. दलित मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळवून देण्याची सूचना आठवले आदित्यनाथ यांना करणार आहेत. 
 

आठवले हे दोन ऑक्टोबर रोजी हाथरस येथे जाणार होते. मात्र तेथील जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी केली होती. प्रशासनाच्या विनंतीमुळे  आठवलेंनी आपला दौरा बदलून लखनौ येथे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आठवले मुंबईत परतले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामदास आठवलेंना दूरध्वनी करून हाथरस प्रकरणी चर्चा केली. हाथरस प्रकरणात पीडित बळीत दलित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन तिला  न्याय मिळवून देऊ ; तिच्या कुटुंबियांना शहरात चांगले घर देणार; कुटुंबातील एकास शासकीय नोकरी देणार ; 25 लाख रुपये सांत्वनपर निधी देणार तसेच या प्रकारणाची सीबीआय द्वारे चौकशी करणार त्याचप्रमाणे या प्रकरणात कारवाईत कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी निलंबित केल्याची माहिती आदित्यनाथ यांनी दिल्याचे आठवले यांच्या कार्यालयाने कळविले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख