मंत्रीमंडळ बैठकीत निश्चिंत दिसणारे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून करणार मोठी घोषणा?

Uddhav Thackeray | FB Live : उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार?
मंत्रीमंडळ बैठकीत निश्चिंत दिसणारे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून करणार मोठी घोषणा?
Uddhav Thackeray_Eknath shindeSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज राजीनामा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विधानसभा बरखास्तीचा ठराव येणार असल्याची चर्चा होती. या सगळ्या चर्चांमुळे राज्याचे मंत्रीही या बैठकीला आज मंत्रिमंडळाची शेवटचीच बैठक असल्याच्या भीतीने पोहचले होते.

मात्र आजची मंत्रिमंडळ बैठक आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना धक्का बसला. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासून कोरोना स्थिती आणि काय उपाययोजना कराव्या यावर दहा मिनिट चर्चा केली. शिवाय बैठकीत कोरोना रुग्ण संख्या यावर चिंता व्यक्त केली. राज्यात मास्क अनिवार्य करायचं का असा प्रश्नच त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारला. त्यावर तुम्ही माहिती घ्या, मी टास्क फोर्सशी चर्चा करतो असे मुख्यमंत्री म्हणाले

Uddhav Thackeray_Eknath shinde
चंद्रकांत पाटील उतरले रिंगणात; ४ आमदारांना सोबत घेवून गुवाहटीला रवाना

त्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देणार का? सरकार बरखास्त होणार का? विधान सभा बरखास्त होणार का? अश्या चर्चेच्या अपेक्षेने आलेल्या मंत्र्यांना धक्का बसला. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री आज निश्चिंत दिसत होते अशीच प्रतिक्रिया अनेक मंत्र्यांनी नोंदवली. मात्र आता संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यामुळे या संवादामध्ये ते कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत ते कदाचित राजीनाम्याची घोषणा करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in