'मविआ'चे सर्व उमेदवार विजयी होणार; मुख्यमंत्री उद्या रणनीतीवर शेवटचा हात फिरवणार!

Mahavikas Aaghadi | Shivsena | NCP | Jayanat Patil : महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले आहे.
'मविआ'चे सर्व उमेदवार विजयी होणार; मुख्यमंत्री उद्या रणनीतीवर शेवटचा हात फिरवणार!
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb ThoratSarkarnama

(Legislative Council Election Latest Marathi News)

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होणार आहेत. याबाबत उद्या रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री ठाकरे महत्वाची बैठक घेणार असून यात निवडणुकीच्या अंतिम रणनीतीवर चर्चा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. (Legislative Council Election Latest Marathi News)

जयंत पाटील म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. यात राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री, महत्वाचे नेते आणि उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निवडणूक लादल्याचा आरोप करत त्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, भाजपला २० मतांची गरज आहे, मात्र तरीही भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणण्याचा आटापिटा सुरु आहे. आमचे सर्वांचे मत होते की लोकशाही मार्गाने फारसा घोडेबाजार न होता निवडणूक पार पडावी. पण आम्हाला त्यात यश आले नाही. मात्र मला खात्री आहे की, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. (Legislative Council Election Latest Marathi News)

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat
शिवसेनेत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांचा नाराजी बॉम्ब; ठाकरेंच्या टेन्शनमध्ये भर

दरम्यान, २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी पुन्हा कंबर कसली आहे. त्यासाठी बैठका आणि आमदारांची जमवाजमव सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये मुंबईत ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम हॉटेल ट्रायडेंटमध्ये आहे. त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गदर्शन केले.

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat
रविवारच्या रात्रीच ठरणार गेम कोणाचा होणार? लाड, जगताप की तिसराच...

शिवसेनेचे आमदार हॉटेल वेस्ट इनमध्ये असून मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते येथे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे उद्या शिवसेनेचा वर्धापन दिनदेखील येथेच साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार तसेच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. काँग्रेसच्या (Congress) आमदारांनादेखील हॉटेल फोर सिझनमध्ये ठेवण्यात आले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. येथे आमदारांना मतदानाच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.

दुसरीकडे भाजपनेदेखील (BJP) आपले आमदार जमवले आहे. भाजपच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही आम्ही चांगली कामगिरी करुन दाखवून, असे भाजपने यापूर्वी बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजपनेदेखील रणनीती आखायला सुरुवात केली आहे. येथे भाजपचे बडे नेते विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गणित जुळवत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in