राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी एका ओळीत दिलं उत्तर

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackerayFile Photo

मुंबई : मागील काही दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महत्वाची मागणी केली आहे. संपूर्ण मराठवाडा, खान्देश व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका ओळीत उत्तर देण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं आणि पशुधनाचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत सरकारनं तातडीनं जाहीर करावी आणि तत्काळ प्रत्यक्षात द्यावी.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
मोदी सत्तेत आल्यापासून 177 आमदार-खासदारांचा काँग्रेसला रामराम

आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशी वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांच्या पशुधनाच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रीतसर मदत केली जाईल, परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, असंही पत्रात म्हटलं आहे.

ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्राद्वारे करत आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे. हे पत्र ई-मेलद्वारे पाठवण्यात आलं आहे. त्यावर ईमेल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला उत्तर देण्यात आलं आहे. ई मेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी कृषी तसेच मदत व पुनर्वसन विभागास पाठवण्यात आला आहे, असं उत्तर मुख्यमंत्री कार्यालयानं दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com