Maharashtra : सभांचा धडाका ; मुख्यमंत्री , फडणवीस, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

सभांमधून कोणत्या मुद्यांवर ही नेतेमंडळी बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. राज ठाकरेंच्या १ मेच्या सभेनंतर हे चित्र अधिक स्पष्ट होईल.
Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updates
Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updatessarkarnama

पुणे : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर (Maharashtra Politics) नजर टाकली तर राज्यात सभांचा धडाका सुरु झाल्याचे दिसते.येत्या पंधरा दिवसात तीन प्रमुख सभा होत आहे. या सभांमधून ही नेते मंडळी काय बोलणार, विरोधकांवर कुठले नवीन टीकास्त्र सोडणार, की सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार हे लवकरच समजेल. (Maharashtra Politics news updates)

आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या खासदारांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर तीस एप्रिलला (शनिवारी) पुण्यात महाविकास आघाडीची अलका टॅाकीज चौकात सभा होणार आहे.या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार,असे मोठे नेते उपस्थित राहणार नसून दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updates
राणे म्हणतात, "हे पवार साहेबच करू शकतात"

उद्या (शनिवार) तीस तारखेला उद्धव ठाकरे हे संपर्कप्रमुखांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर १ मे, महाराष्ट्र दिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. याच दिवशी (१ मे) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)हे मुंबईत पोलखोल अभियानाअंतर्गत सभा घेणार आहे. ही सभा शिवसेनेला टारगेट करण्यासाठी नक्कीच असेल.मुंबई महापालिकेतील भष्ट्राचाराची पोलखोल फडणवीस या सभेत करण्याची शक्यता आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या बेस्टच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेची घोषणा केली. ते म्हणाले,"मला मास्क काढायचा आहे, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे," मुख्यमंत्र्यांची ही सभा १४ मे रोजी बीकेसीमध्ये होणार आहे.

Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updates
राज ठाकरेंच्या उत्तर सभेनंतर आता देवेंद्र फडणवीस घेणार बूस्टर डोस सभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात नुकतीच सभा झाली. आता उद्धव ठाकरे,राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. गेल्या महिनाभरात राज्यातील सभांना राज ठाकरेंनी सुरवात केली, गुढीपाडव्याला त्यांनी सभा घेतली. त्यानंतर ठाण्यात त्यांची उत्तर सभा झाली.

आता इतर पक्षांच्या नेत्यांनीही सभांचा धडाका लावल्याचे चित्र आहे. पण राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या सभांमुळे सभांचे पेव फुटलं असं म्हटलं तर वावगं ठरु नये. कारण या सभेपूवी शिवसेनचे खासदार संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे विरुद्ध सोमय्या, शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष आपण पाहिला.

Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News, Raj Thackeray News, Maharashtra Politics news updates
MNS : असा आहे मनसेचा 'आर प्लान'; कार्यकर्ते सज्ज

पण राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर हिंदुत्व, मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा या मुद्यांवर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. येत्या सभांमधून कोणत्या मुद्यांवर ही नेतेमंडळी बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. राज ठाकरेंच्या १ मेच्या सभेनंतर हे चित्र अधिक स्पष्ट होईल.

एकुणच सध्या कुठल्याही निवडणुका नाही, तरी आपल्या पक्षाचे ध्येयधोरण काय आहेत, याकडे जनतेचे लक्ष वेधण्याकडे या सभांचे आय़ोजन केल्याचे दिसते. या सभांमधून ही नेते मंडळी काय बोलणार, विरोधकांवर कुठले नवीन टीकास्त्र सोडणार, की सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com