आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको ; मुख्यमंत्र्यांचा दगाबाजांना इशारा

उद्याच्या विधान परिषद निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. राज्यसभेत शिवसेनेचा एकही मत फुटले नव्हते आणि तो विधान परिषदेतही फुटणार नाही.
आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको ; मुख्यमंत्र्यांचा दगाबाजांना इशारा
CM Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरुन सध्या हॉटेल पॉलिटिक्स सुरु आहे. यावर टीका होत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. या हॉटेल पॉलिटिक्सवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Uddhav Thackeray latest news)

"आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणे हीच आजची लोकशाही आहे. आज आपल्यासोबच 56 आमदार आहे. उद्याच्या विधान परिषद निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. राज्यसभेत शिवसेनेचा एकही मत फुटले नव्हते आणि तो विधान परिषदेतही फुटणार नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुणी काय कलाकाऱ्या केल्या हे कळालं..

"शिवसेनेमध्ये गद्दार कोणी राहिलेला नाही, कुणी काय कलाकाऱ्या केल्या हे कळालं आहे. एकदा मागे मतांमध्ये फाटाफूट झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की,"मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको" हे वाक्य खूप मोलाचे असून मला असा नराधम शिवसेनेत नको आहे," असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दगाबाजांना इशारा दिला.

CM Uddhav Thackeray
भाडोत्री सैन्य हा काय प्रकार ? ; अग्निपथवरुन मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हिंदुत्वाचे डंके सुरू

मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यांवरुन विरोधकांवर निशाणा साधला. "आज जे काही हिंदुत्वाचे डंके सुरू आहे. ज्यावेळी कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हते.गर्व से कहो हम हिंदू है या घोषणा द्यायला कोणाही तयार नव्हते कारण हिंदू बोलणे हा त्याकाळी गुन्हा समजा जायचा तेव्हा हिंदूत्वाचा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला.आज सुरू असलेले हिंदूत्व त्यांच्यासाठी असेल मात्र, ते माझ्यासाठी नाहीये," असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरेंना दमडीची किंमत नाही..

"शिवसेनेचे आज आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्धव ठाकरे यांना दमडीची किंमत नाही मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यावर समोरचा माणूस आदराने पाहतो. मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय मला काहीच फरक पडत नाही, कारण माझे जे नाव आहे ते कुणीही काढू शकत नाही. ते मला कित्येक जन्माचा भाग्य आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

'अग्निपथ' हे मृगजळ

अग्निपथ योजनेवरुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, "भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे," असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. "नोकरीचे आमिष दाखविणारे हे सरकार आहे, तरुणांवर ही वेळ कोणी आणली, अग्निपथ योजनेवरुन तरुणाची माथी कोणी भडकवली," असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला. 'ही योजना मृगजळ आहे,' असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in