भाजपकडे कोणते मतदारसंघ, कोणते जिंकले... सविस्तर माहिती द्या! मुख्यमंत्री ठाकरेंचा 'प्लॅन'

महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमधील राजकीय वाद जोरदार पेटला आहे. सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यासह भाजपने शिवसेनेला घेरले आहे.
भाजपकडे कोणते मतदारसंघ, कोणते जिंकले... सविस्तर माहिती द्या! मुख्यमंत्री ठाकरेंचा 'प्लॅन'
Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि भाजपमधील (BJP) राजकीय वाद जोरदार पेटला आहे. सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यासह भाजपने शिवसेनेला घेरले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, भ्रष्टाचार हे मुद्दे प्रकर्षाने मांडले जात आहेत. या टीकेला शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या बैठकीत ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतल्याचे समजते.

शिवसेनेच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसेनेचे (Shiv Sena) शिवसंपर्क अभियान दोन दिवसांनी सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एका मागून एक घटना घडत असून मला एका जागी बसावं लागत आहे. कोरोनाच्या लाटेमुळे शिवसंपर्क अभियान राबवता आले नाही. नंतर माझं मानेचं दुखणं सुरू झालं. शिवसेनेचे विचार गावा गावात पोहचवण्याची गरज आहे. सत्ता आल्यानंतर निकाऱ्यावर जमलेल्या राखेले फुंकर मारणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याचे समजते.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
'एमआयएम'च्या आघाडीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री ठाकरेंचं पहिल्यांदाच मोठं वक्तव्य

काही मतदारसंघांमध्ये पक्ष वाढविणे गरजेचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या सोबत भाजपने युती तोडली. आता भाजप कडे कोणते मतदार संघ आहेत, कोणते जिंकले, त्या ठिकाणी तयारी करा, त्याची सविस्तर यादी मला द्या, असं आवाहन करत ठाकरे यांनी भाजपच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचे समजते. तिथं नव्या जोमाचा उमेदवार तयार करा, माझ्या कडे नाव दया, असं स्पष्ट करत ठाकरे यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केलं.

कोरोनामुळे शिवसंपर्क अभियानाला उशिर झाला. काही दिवसांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असल्याचंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बारा आमदारांची निवड न करणं, हा लोकशाहीचा खून असल्याचे म्हणत ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला. तर महाविकास आघाडी सरकार आणि दाऊदचा संबंध जोडणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीका केली. सरकारचा दाऊदशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे ठाकरे म्हणाले.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
अविवाहित आमदाराचं नाव गाडीच्या नंबरप्लेटवर लिहित तरूण म्हणतोय, मी त्यांचा नातू!

'एमआयएम'शी युती नाही

खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी एमआयएमशी आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे समजते. एमआयएम ही भाजपची बी टीम असून कधीच युती करणार नाही, असं ठाकरेंनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे. हा शिवसेनेला बदनाम करण्याचा कट आहे. हा कट उधळून लावा, असे आदेशही ठाकरे यांनी खासदारांना दिल्याचे समजते. महाविकास आघाडी म्हणून आपण एक असून आघाडीचा धर्म पाळा, असं आवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in