मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुगली; शिंदे उत्तर देणार की माघारी फिरणार?

CM Uddhav Thackeray | Eknath Shinde | : थोड्याच वेळात एकनाथ शिंदे काय घोषणा करणार?
Uddhav Thackeray | Eknath Shinde
Uddhav Thackeray | Eknath ShindeSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. याच सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केले. यावेळी बोलताला मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदेंसमोर गुगली टाकत समोर येवून राजीनाम्याची मागणी करण्याबाबत सांगितले. तसेच माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही, असे म्हणतं भावनिक आवाहनही केले आहे. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, अशी बातमी पसरवली गेली. २०१४ ला एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आले ते पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची, पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने मिळवले. '२०१४ नंतर मंत्रिपदं उपभोगलीत, ती बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेमुळे मिळाली, हे मात्र लक्षात राहू द्या, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray | Eknath Shinde
गुलाबराव 'सरकारनामा'शी बोलले : मी गुवाहटीला चाललो... हितं काय करू?

यावेळी ते म्हणाले, हो मला धक्का बसला, दुःख झालं. सकाळी कमलनाथ आणि शरद पवारांचा (Sharad Pawar) फोन आला. त्यांनी सांगितले आम्ही तुमच्या सोबत आहेत. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी पद सोडायला तयार. आज मी वर्षावरील मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला. तसेच शिवसेनेचा दुसरा कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे, असेही ते म्हणाले. (Uddhav Thackeray | Eknath Shinde Latest Marathi News)

कुऱ्हाडीची गोष्ट सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे.

Uddhav Thackeray | Eknath Shinde
कॅबिनेटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना धक्का; ठाकरेंनी विषयच काढला नाही

एकदा ठरवू या समोर या, सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी पद सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. तुम्ही आमच्या कुटुंबातले वाटता, ही जनतेने दिलेली प्रतिक्रिया माझी कमाई आहे. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. माझे हे नाटक नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या या गुगलीवर आणि भावनिक आवाहनावर एकनाथ शिंदे उत्तर देणार की माघारी फिरणार हे बघणं महत्वाचं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com