'एमआयएम'च्या आघाडीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री ठाकरेंचं पहिल्यांदाच मोठं वक्तव्य

'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे प्रस्ताव दिला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठलं आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील (Imtaiz Jalil) यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे प्रस्ताव दिला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेसनं (Congress) थेट हा प्रस्ताव नाकारलेला नाही. त्यावर आता शिवसेनेकडून (Shiv Sena) स्पष्टपणे भूमिका मांडण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी खासदारांच्या बैठकीत पहिल्यांचा वक्तव्य केलं आहे.

खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी एमआयएमशी (AIMIM) आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे समजते. एमआयएम ही भाजपची (BJP) बी टीम असून कधीच युती करणार नाही, असं ठाकरेंनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे. हा शिवसेनेला बदनाम करण्याचा कट आहे. हा कट उधळून लावा, असे आदेशही ठाकरे यांनी खासदारांना दिल्याचे समजते. महाविकास आघाडी म्हणून आपण एक असून आघाडीचा धर्म पाळा, असं आवाहनही त्यांनी केले.

CM Uddhav Thackeray
अविवाहित आमदाराचं नाव गाडीच्या नंबरप्लेटवर लिहित तरूण म्हणतोय, मी त्यांचा नातू!

महाराष्ट्रभर हिंदूत्व (Hindutva) पोहचवा. भाजपच हिंदुत्व केवळ राजकारणापुरतं आहे. मेहबुबा मुफ्तींसोबत गेले हे विसरले का, अशी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका, असंही ठाकरे म्हणाले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह इतर खासदार व पदाधिकारी उपस्थित होते. यावळी बोलताना विनायक राऊत यांनीही भाजपवर टीका केली.

काही जण शिवसेनेची हिदुत्वाबद्दल शंका घेत असताना त्यांना दाखवायचे आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. हिंदुत्वाचा गजर आम्ही उठवणार आहोत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे हे बाळासाहेबांनी आधी सांगितले. मतांसाठी भगवतगीता अभ्यासक्रमात घालण्यापेक्षा आम्ही हिंदुत्वाचा जागर करत आहोत, असं राऊत म्हणाले.

CM Uddhav Thackeray
IPS त्रिपाठींची कुंडली बाहेर येणार; पोलिसांच्या पाच पथकांनी आवळला फास

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना हा दिशाहीन पक्ष असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. तर जलील यांनी आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासही तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एका जलील यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in