आम्ही बनावट अन् नकली हिंदुत्ववाद्यांना पोसलं ; मुख्यमंत्री ठाकरेचं टीकास्त्र

देशाचे शत्रू संपवण्यापेक्षा पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे.
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा आणि हिंदुत्वाची कास धरलेल्या राज ठाकरेंनी (raj Thackeray) आता भाजपबद्दल नरमाईची भूमिका घेत थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांच्याशी संवाद साधला. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे (raj Thackeray) आणि भाजपवर टीका केली.

"देशाचे शत्रू संपवण्यापेक्षा पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे,आम्ही बनावट आणि नकली हिंदुत्ववाद्यांना पोसले," असा शब्दात कुणाचाही नामोउल्लेख न करता राज ठाकरे व भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं.

Cm Uddhav Thackeray
ED ची मोठी कारवाई ; अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा अडचणीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "हिंदूंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी-अमराठी असा वाद निर्माण करण्याची ही भाजपची चाल आहे.संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने फोडली. जागांसाठी ती फोडली. त्यावेळेला जनसंघाने फोडली यांना मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. त्यांना सगळ स्वतः करता हे हवं आहे. बाळासाहेब म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे,"

Cm Uddhav Thackeray
बाबरी पाडली तेव्हा राज कुठे होते ? असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेचा हल्लाबोल

"शिवसैनिक अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही.गावातील जनतेला मदत करा. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. तुमच्या सोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली आहे. जन्मापासून शिवसेनेकडे नविन तरुण रक्त आहे.गावागावातील शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या, " असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com