नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला न जाता ठाकरे कुटुंबीय घेणार एका 'खास' व्यक्तीची भेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आहेत. त्यांना लता दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला न जाता ठाकरे कुटुंबीय घेणार एका 'खास' व्यक्तीची भेट!
Rashmi Thackeray, Aditya Thackeray, CM Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत आहेत. त्यांना लता दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. ते उपस्थित राहणार नसल्याचे समजते. ते याचवेळेत एका खास व्यक्तीची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे तिघे या व्यक्तीला भेटणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला न जाता मुख्यमंत्री ठाकरे ज्यांची भेट घेणार आहेत, ती व्यक्ती शिवसेनेसाठीच खास आहे. मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला आहे. यावरून शनिवारी दिवसभर मुंबईत मोठा राडा झाला. यावेळी अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे या आजाही हिरिरीनं सहभागी झाल्या होत्या.

Rashmi Thackeray, Aditya Thackeray, CM Uddhav Thackeray
विरोधकांचा सुफडा साफ करत भाजपचा महापालिकेत दणदणीत विजय

चंद्रभागा शिंदे (Chandrabhaga Shinde) यांचीच ठाकरे कुटुंबीय भेट घेणार आहेत. त्या शिवडी येथे राहणाऱ्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्या शिवसेनेशी जोडल्या गेल्या आहेत. तळपत्या उन्हात मातोश्रीबाहेर थांबून राणा दाम्पत्याचा विरोध त्या करत होत्या. त्यामुळे काहीवेळ त्यांना मातोश्रीमध्येही बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबीय त्यांची सायंकाळी सहा वाजता भेटणार आहेत. दरम्यान, या आजीबाईंना पाहून शिवसेना कार्यकर्त्यांनीही रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या जात होत्या. या वेळी चंद्रभागा यांनी राणा दांपत्याला पुष्पास्टाईल इशारा दिला. झुकेगा नही साला, असे त्या म्हणाल्या.

मागील दोन दिवस रवी राणा मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिक त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली, विचारणा आजीबाईंनी केली. तू मातोश्रीवर येऊन दाखवच, असं थेट आव्हानही या आजीबाईंनी दिलं होतं. या चंद्रभागा आजीबाईंची बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोचली. यानंतर त्यांनी तातडीने फोनवरून त्या आजींशी संपर्क साधला होता. त्यांनी आजींना थेट मातोश्रीवरच बोलावून घेतलं. त्यावेळी आजींनी मी तुमच्यासाठी इथे बसलेय, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. फार वेळ बसू नका, चहापाणी झालं, असंही त्यांनी विचारलं. आजींनीही साहेब जय महाराष्ट्र म्हणत तुमच्यासाठी इथेच बसणार, असंही मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितलं होतं.

Rashmi Thackeray, Aditya Thackeray, CM Uddhav Thackeray
अनुभवी नेत्यांनी चुकेल त्यांचे कान धरले पाहिजेत! पवारांसमोरच राणेंनी केली तक्रार

शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार राणा दांपत्याने शुक्रवारी (ता.22) पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. त्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले होते. शनिवारी दिवसभर मुंबईत यावरून जोरदार राडा झाला. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आले असून रविवारी दोघांनाही न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.