Ambadas Danve आक्रमक ; राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा

Ambadas Danve : राजकारण करत राज्यपालांनी याबाबत वेळ घालवला, असा आरोप त्यांनी केला आहे.
Opposition Leader Ambadas Danve News
Opposition Leader Ambadas Danve NewsSarkarnama

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांना पाठवली होती. मात्र, राज्यपाल यांनी अजूनही त्या यादीला मंजूरी दिलेली नाही. (Ambadas Danve news update)

आता नव्या शिंदे सरकारमुळे (Eknath Shinde) पुन्हा ती यादी चर्चेत आली आहे. 'जुन्या नावांची यादी रद्द समजावी, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनाला पाठवले आहे. त्यामुळे आता त्या यादीच काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दोन महिने उलटली. काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. आता चर्चा विधान परिषदेच्या त्या १२ नावांच्या यादीची सुरू झाली आहे.

Opposition Leader Ambadas Danve News
Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले..

शिंदे सरकारने राज्यपालांना नवीन यादी पाठवली आहे, यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या यादीवरुन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे.

अंबादास दानवे म्हणाले, "राज्यपाल पक्षपातीपणे वागत असल्याचे सिद्ध होत आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या नावांची यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. तसे केल्यास पुन्हा एकदा कोर्टात जाऊ," राजकारण करत राज्यपालांनी याबाबत वेळ घालवला, असा आरोप त्यांनी केला आहे.

शिंदेंनी हे पत्र राज्यपालांना गेल्या आठवड्यात पाठवल्याची माहिती आहे. याआधी ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी 4 जणांचा समावेश आहे. त्यामुळे ही यादी रद्द झाल्यास आघाडीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना धक्का बसणार आहे.

शिंदे-फडणवीसांकडे १२ नावांसाठी कितीतरी पटीने इच्छुकांची संख्या आहे. या १२ नावांसाठी अनेक नेत्यांनी लॅाबिंग देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता या यादीत कोणाचा समावेश होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिंदे – फडणवीस पक्षातील कोणत्या नेत्यांना या 12 नावांच्या यादीत स्थान दिले जाईल याचा अंदाज आता लावला जात आहे. महविकास आघडी सरकारने २०२० मध्ये नाव पाठवली होती, पण राज्यपालांनी ती नाव मंजूर न केल्याने विधान परिषदेतील बारा जागा रिक्त आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in